advertisement

18 वर्षांच्या तरुणीने संपवलं जीवन, काही मिनिटातच 27 वर्षांच्या भावकीतील तरुणानेही दिला जीव; सावंतवाडीत खळबळ

Last Updated:

सिंधुदुर्गात एकाच दिवशी एकाच भावकीतील दोघांच्या आत्महत्येनंतर सावंतवाडी हादरले असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

News18
News18
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भावकीतील दोघांनी काही वेळाच्या अंतराने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकरा समोर आला आहे. 18 वर्षीय सिद्धी (नाव बदलले आहे) , अभिजीत तुकाराम बिरोडकर (वय 27, रा. बिरोडकर टेंब) अशी जीव देणाऱ्या दोघांची नावं आहेत. दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सावंतवाडीतील टेंब परिसरात ही घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी एका तरुणीने राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवले. तर दुसरीकडे भावकीतील नातेवाईक असलेल्या अभिजीतने घरापासून काही अंतरावर साडीच्या सहाय्याने गळफास घेत आयुष्य संपवले. या घटनेनंतर बिरोडकर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर एकाच दिवशी एकाच भावकीतील दोघांच्या आत्महत्येनंतर सावंतवाडी हादरले असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
advertisement

दोघांसोबत नेमकं काय घडलं?

सिद्धी आणि अभिजीतच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सिद्धीने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. सध्या सुट्या असल्याने ती घरीच असायची. गुरुवारी ती एका कार्यक्रमासाठी बाहेर गेली होती, तिथून ती घरी आली आणि रूममध्ये गेली. मात्र दुपारचे दोन वाजले तरी पुजा जेवणासाठी बाहेर न आल्याने आईने खोलीत जाऊ पाहिले. खोलीचा दरवाजा हा बंद होता. आवाज देऊनही दरवाजा न उघडल्यने आईने शेजाऱ्यांना कल्पना दिली. दरवाजा तोडून आत गेल्यानंतर सिद्धीने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. हा धक्कादायक प्रकार पाहताच कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. त्यानंतर तिला खाली उतरवून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वीच तिचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
advertisement

अभिजीतने टेकडीवर जाऊन संपवलं आयुष्य

दरम्यान या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर तिच्या भावकीतील अभिजीत बिरोडकर हा आपल्या मित्रांसमवेत घटनास्थळी झाला. मात्र काही वेळानंतर तो देखील गायब झाला आणि त्याचा मोबाईल बंद स्थितीत होता, नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. तसेच याबाबत सावंतवाडी पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी दाखल होत मोबाईल टॉवर लोकेशनचा शोध घेतला असता घरापासून काही अंतरावरील चिवार टेकडी परिसरात त्याचे लोकेशन आढळून आले. या परिसरात शोध घेतला असता एका उंच झाडावर साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत अभिजितचा मृतदेह आढळला.
advertisement

भावकीवर दुःखाचा डोंगर कोसळला

शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईक तसेच शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भावकीतील दोन मुलांची एकाच दिवशी आयुष्य संपवल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्या दोघांनी हे टोकाचे पाऊल का उचलले असावे याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
18 वर्षांच्या तरुणीने संपवलं जीवन, काही मिनिटातच 27 वर्षांच्या भावकीतील तरुणानेही दिला जीव; सावंतवाडीत खळबळ
Next Article
इराणच्या हाती जगाला 'ऑफलाईन' करणारं महाभयंकर हत्यार; इंटरनेटचा 'ब्लॅकआउट' होणार? WhatsApp, Instagram, Google होणार ठप्प
इराणच्या हाती जगाला 'ऑफलाईन' करणारं महाभयंकर हत्यार; इंटरनेटचा 'ब्लॅकआउट' होणार? WhatsApp, Instagram, Google होणार ठप्प
  • इराणचा सर्वात मोठा इशारा!

  • एका सेकंदात संपूर्ण जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार?

  • जगाची डिजिटल लाइफलाईन कापून टाकणारा

View All
advertisement