ऑनलाइन दुरुस्तीची प्रक्रिया कशी कराल?
अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
सर्वप्रथम https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
Mutation 7/12 पर्याय निवडा
यामध्ये ‘Mutation 7/12’ हा पर्याय निवडून, संबंधित माहिती तपासा आणि अर्ज भरण्यापूर्वी नोंदणी (Registration) व लॉगिन (Login) प्रक्रिया पूर्ण करा.
हस्तलिखित उतारा अपलोड करा
तुमचा हस्तलिखित सातबारा उतारा स्कॅन करून, तो अर्जासोबत ऑनलाइन अपलोड करा.
advertisement
युजर अकाऊंट कसे तयार कराल?
https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/Account/Register या लिंकवर जाऊन, नाव, ई-मेल व मोबाईल नंबर प्रविष्ट करा. पासवर्ड तयार करा आणि "Send OTP" वर क्लिक करा. मोबाईल व ई-मेलवर आलेला OTP टाका आणि सबमिट करा
लॉगिन प्रक्रिया कशी कराल?
तयार केलेल्या ई-मेल व पासवर्डने लॉगिन करा. "Mutation 7/12" पर्याय निवडा. अर्जामध्ये दुरुस्तीची माहिती भरा,आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सबमिट करून प्रिंटआउट काढा व तलाठी कार्यालयात सादर करा
तलाठी कार्यालयात पुढील काय प्रक्रिया होते?
तलाठी कार्यालय तुमच्या अर्जाची व कागदपत्रांची पडताळणी करेल. आवश्यक असल्यास तहसीलदारांकडून संमती घेतली जाईल. काही वेळा तपासणीचे आदेश देण्यात येतात. अर्जदाराला नोटीस बजावली जाते आणि अंतिमतः दुरुस्ती केली जाते.
दुरुस्ती का आवश्यक आहे?
1) सातबारा उताऱ्यात वेळेवर दुरुस्ती न केल्यास भविष्यात जमिनीच्या मालकी हक्कावर प्रश्नचिन्ह उभे राहतात.
2) वारसाहक्क, विक्री व्यवहार, कर्ज प्रक्रिया यामध्ये अडथळे येतात.
शेरा किंवा नाव वगळल्यास, पुनर्लेखनाच्या वेळेस (प्रत्येकी १० वर्षांनी) समस्यांचा सामना करावा लागतो.
3) जर एखाद्या खातेदाराचे नाव वगळले गेले असेल किंवा तांत्रिक त्रुटीमुळे काही माहिती चुकीची भरली गेली असेल, तर ती कलम 155 अंतर्गत दुरुस्त केली जाऊ शकते.
दरम्यान, जमिनीच्या नोंदीमधील पारदर्शकता राखण्यासाठी व भविष्यातील विवाद टाळण्यासाठी सातबारा उताऱ्यातील त्रुटी वेळेवर दुरुस्त करणे आवश्यक आहे. राज्य सरकारने दिलेल्या ई-हक्क प्रणालीमुळे ही प्रक्रिया आता ऑनलाइन व सुलभ बनली आहे. शेतकरी व जमीन धारकांनी वेळ वाचवत अधिकृत मार्गाचा वापर करावा, हीच योग्य दिशा आहे.