APMC Market: रविवारी मार्केट हाललं, आल्याची आवक वाढली, डाळिंब अन् केळीला किती मिळाला भाव?
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
APMC Market: कृषी मार्केटमधील डाळिंब, केळी आणि आले बाजारात मोठ्या रविवारी मोठ्या घडामोडी दिसल्या. आवक आणि दराबाबत जाणून घेऊ.
सांगली: महाराष्ट्रातील कृषी मार्केटमध्ये रोज मोठ्या उलाढाली होत असतात. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात फळबाजारात मोठे बदल दिसत आहेत. काही हंगामी फळांची आवक घटली असून त्यांच्या दरात तेजी आली आहे. कृषी मार्केटमधील डाळिंब, केळी आणि आले दरात रविवारी मोठ्या घडामोडी दिसल्या. 8 फेब्रुवारी रोजी या फळांची आवक आणि दर यांबाबत अपडेट जाणून घेऊ.
आल्याच्या आवकेत सुधारणा
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 88 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी पुणे मार्केटमध्ये सर्वाधिक 69 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 4000 ते 4500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच अहमदनगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 7 क्विंटल आल्यास 5000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
केळीला किती मिळाला दर?
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 107 क्विंटल केळीची आवक पुणे बाजारात राहिली. त्यास प्रतीनुसार 2000 ते 6000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला.
डाळिंबाची आवक कमी
आज राज्याच्या मार्केटमध्ये केवळ 4 क्विंटल डाळिंबाची आवक पुणे बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 15000 ते 18000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. डाळिंबाची आवक घटत असल्याने दर तेजीत असल्याचे चित्र कृषी मार्केटमध्ये दिसत आहे.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 9:24 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: रविवारी मार्केट हाललं, आल्याची आवक वाढली, डाळिंब अन् केळीला किती मिळाला भाव?







