advertisement

सुरज चव्हाण ठरला 'भारतातील सर्वात देखणा पुरुष'? थेट जस्टिन बीबरशी तुलना, बिग बॉस विनर इंटरनेटवर ट्रेंडिंग

Last Updated:
Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: सध्या इंटरनेटवर एक चर्चा वाऱ्यासारखी पसरतेय, ती म्हणजे सूरजला चक्क "भारतातील सर्वात देखणा पुरुष २०२५" हा किताब मिळाल्याची.
1/9
नियतीचा खेळ कधी फिरेल, याचा नेम नसतो. बारामती जवळच्या मोढवे गावातील एका छोट्याशा झोपडीत राहणारा, दिवसभर उन्हात ३०० रुपयांसाठी मजुरी करणारा एक साधा मुलगा आज अख्ख्या भारताच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

2/9
हा स्टार आहे, 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता आणि सोशल मीडियाचा किंग सूरज चव्हाणबद्दल. सध्या इंटरनेटवर एक चर्चा वाऱ्यासारखी पसरतेय, ती म्हणजे सूरजला चक्क
हा स्टार आहे, 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता आणि सोशल मीडियाचा किंग सूरज चव्हाणबद्दल. सध्या इंटरनेटवर एक चर्चा वाऱ्यासारखी पसरतेय, ती म्हणजे सूरजला चक्क "भारतातील सर्वात देखणा पुरुष २०२५" हा किताब मिळाल्याची. ही बातमी खरी की खोटी, हे स्पष्ट नसलं तरीही सूरजने पुन्हा एकदा सिस्टीम हँग केली आहे.
advertisement
3/9
सूरजचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा आहे. लहानपणीच आई-वडिलांचं छत्र हरवलं, गरिबीमुळे आठवीतच शाळा सोडावी लागली आणि पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करावी लागली. पण सूरजच्या मनात काहीतरी वेगळं करण्याची जिद्द होती.

4/9
हातातील साध्या मोबाईलवरून त्याने 'झपुक झुपुक' म्हणत बनवलेले रील्स प्रेक्षकांच्या मनाला भिडले. त्याचे ते हावभाव, अतरंगी स्टाईल आणि
हातातील साध्या मोबाईलवरून त्याने 'झपुक झुपुक' म्हणत बनवलेले रील्स प्रेक्षकांच्या मनाला भिडले. त्याचे ते हावभाव, अतरंगी स्टाईल आणि "बुक्कीत टेंगूळ" हा डायलॉग गाजला आणि पाहता पाहता त्याचे इन्स्टाग्रामवर २७ लाखांहून अधिक फॉलोअर्स झाले.
advertisement
5/9
सध्या फेसबुक आणि यूट्यूबवर अनेक फॅन पेजेस असा दावा करत आहेत की, सोनी टीव्हीच्या एका कथित पोलमध्ये सूरजने बड्या बड्या बॉलिवूड स्टार्सना मागे टाकत 'हँडसम मॅन'चा किताब जिंकला आहे.

6/9
तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर अधिकृतपणे अशी कोणतीही घोषणा झालेली नाही, पण सूरजच्या चाहत्यांसाठी तोच जगातील सर्वात देखणा माणूस आहे. त्याची ती २०१० च्या काळातील 'जस्टिन बीबर' हेअर स्टाइल आजही त्याची सिग्नेचर बनली आहे.

7/9
फॅक्ट चेकर्स याला फॅन्सनी पसरवलेली अफवा म्हणत असले, तरी सूरजची लोकप्रियता ही कोणत्याही अधिकृत किताबापेक्षा मोठी आहे.

8/9
२०२४ मध्ये 'बिग बॉस मराठी' जिंकल्यानंतर सूरजचं नशीब उजळलं. आता तो केवळ रील स्टार राहिला नसून मराठी चित्रपटांमधील अभिनेता झाला आहे. २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'झपुक झुपुक' या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं.

9/9
काही रिपोर्ट्सनुसार, आज सूरज प्रमोशन आणि इव्हेंट्सच्या माध्यमातून एका एका कार्यक्रमाचे ४० ते ५० हजार रुपये मानधन घेतो. महिना काही लाख रुपये कमावणारा सूरज आजही तितकाच जमिनीवर असून आपल्या गावाशी नाळ जोडून आहे.

सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement