मेष (Aries) : श्री गणेश सांगतात, कामाच्या ठिकाणी काही बदल होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या सहकाऱ्यांचा मूड बिघडू शकेल. पण तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे वातावरण निवळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. भावाबहिणींचे सहकार्य मिळेल. त्यामुळे तुमच्यासाठी लाभदायक स्थिती निर्माण होईल. तुमच्या वडिलांकडून पूर्ण सहाकार्य मिळेल. पत्नीची तब्येत बिघडल्याने काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
Lucky Color : Orange
Lucky Number : 2
वृषभ (Taurus) : श्री गणेश सांगतात, संध्याकाळी घरी पाहुणे आल्याने तुम्हाला आनंद वाटेल. शुभ कार्यात सहभागी व्हाल. तिथे तुमचा मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील सदस्यांचा दिवस आनंदात जाईल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. एखादी चांगली बातमी समजेल. आरोग्याच्या बाबतीत सावध रहा. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता विकसित होईल. तुम्हाला आईकडून चांगलं सहकार्य मिळेल. कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे.
Lucky Color : Navy Blue
Lucky Number : 9
मिथुन (Gemini) : श्री गणेश सांगतात, कौटुंबिक व्यवसायात जोडीदाराने दिलेल्या सल्ल्यामुळे तुमचा आर्थिक नफा वाढेल. अधिकाऱ्यांच्या सहकार्याने मौल्यवान वस्तू किंवा मालमत्ता मिळवण्याची इच्छा पूर्ण होईल. वडिलांचे सहकार्य मिळेल. ऑफिसमध्ये जास्त व्यस्त रहाल. अनावश्यक खर्च टाळा. अनुभवांच्या आधारे कठीण समस्येवर उपाय शोधाल. जीवनात गोडवा असेल. सत्पुरुषांच्या दर्शनामुळे तुमचे मनोबल वाढेल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात तुमची कीर्ती वाढेल.
Lucky Color : Maroon
Lucky Number : 10
कर्क (Cancer) : श्री गणेश सांगतात, कौटुंबिक स्थिती काहीशी तणावपूर्ण असेल. तुमच्या सर्व समस्या भावाच्या सहकार्यानं दूर होतील. संध्याकाळचा वेळ देवदर्शन आणि धार्मिक गोष्टीत जाईल. रखडलेली कामं पूर्ण करून जास्त पैसे कमवाल. त्यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढेल. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. सामाजिक कार्य केल्यास तुमचा सन्मान वाढेल.
Lucky Color :
Lucky Number :
सिंह (Leo) : श्री गणेश सांगतात, मुलांप्रती असलेल्या तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील. बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा. कारण त्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. लव्ह लाईफमध्ये बोलण्यावर नियंत्रण ठेवले तरच नात्यात गोडवा येईल. मोठ्या भावाशी कौटुंबिक योजनांवर चर्चा कराल. एखादी प्रिय व्यक्ती घरी येऊ शकते. त्यामुळे तुमचा संध्याकाळचा वेळ हास्यविनोदात जाईल. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना फूट पडल्याने यश मिळेल. या व्यक्ती नवीन कामांची रूपरेषा आखतील. विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची इच्छा पूर्ण होईल.
Lucky Color : Brown
Lucky Number : 18
कन्या (Virgo) : श्री गणेश सांगतात, परदेशातून एखादी चांगली बातमी समजू शकते. त्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल आणि योजनांना गती मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींची सेवा किंवा धर्मादाय कामांसाठी पैसे खर्च केल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. वैवाहिक जीवन सुखद असेल. कौटुंबिक सुखसमृद्धीसाठी कोणत्याही गोष्टी सहन कराल. गुंतवणुकीसाठी वेळ योग्य आहे. व्यवसायातील विरोधक पराभूत होतील. त्यामुळे तुमची विरोधकांपासून सुटका होईल.
Lucky Color : Sky Blue
Lucky Number : 3
तूळ (Libra) : श्री गणेश सांगतात, कार्यक्षेत्रात तुमच्या वक्तृत्वामुळे तुम्हाला विशेष सन्मान मिळेल. नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल. जास्त धावपळ टाळा. हवामान बदलामुळे आरोग्य बिघडू शकते. कौटुंबिक व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या पाठिंब्याची आणि सहवासाची गरज भासेल. जोडीदाराचा पाठिंबा मिळाल्यास तुम्हाला मदत होईल. अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी प्रस्ताव मिळू शकतो.
Lucky Color : Pink
Lucky Number : 12
वृश्चिक (Scorpio) : श्री गणेश सांगतात, बोलण्यावर निय़ंत्रण ठेवा अन्यथा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागेल. बेरोजगार युवकांना नोकरी मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांशी केलेली चर्चा फायदेशीर ठरेल. नात्यात गोडवा येईल. वडिलांकडून धनलाभ होऊ शकतो. धार्मिक गोष्टींमुळे मन प्रसन्न राहील. आरोग्यविषयक नियमांचं पालन करा. आजारांपासून सावध राहा. व्यवसायात ज्येष्ठ व्यक्तीच्या मदतीमुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. रखडलेली कामं पूर्ण होतील.
Lucky Color : Green
Lucky Number : 1
धनू (Sagittarius) : श्री गणेश सांगतात, गृहोपयोगी वस्तूंसाठी पैसे खर्च होतील. सांसारिक सुखात वाढ होईल. पैशाचे व्यवहार टाळा, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. न्यायालयीन खटल्यात यश मिळू शकतं. कुटुंब प्रमुख घरातील तरुणांसोबत मजेत वेळ घालवतील. कौटुंबिक मालमत्ता मिळू शकते. नोकरदार किंवा नातेवाईकामुळे मानसिक ताण वाढू शकतो, त्यामुळे काळजी घ्या.
Lucky Color : Yellow
Lucky Number : 16
मकर (Capricorn) : श्री गणेश सांगतात, वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. कारण अचानक वाहन बिघडल्यास खर्च वाढू शकतो. संध्याकाळी धार्मिक स्थळी भेट देण्याचे नियोजन असेल तर पुढे ढकलले जाऊ शकते. व्यवसायात चांगला लाभ होईल. नोकरी बदलण्याचा विचार असेल तर ही वेळ त्यासाठी अनुकूल आहे. यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यात त्यांना यश मिळेल.
Lucky Color : Blue
Lucky Number : 7
हनुमानाच्या या मंत्रांमध्ये आहे प्रचंड शक्ती, जप केल्यास होतील सर्व संकटे दूर
कुंभ (Aquarius) : श्री गणेश सांगतात, दिवस आत्मविश्वास वाढवणारा आहे. याचा फायदा कामाच्या ठिकाणी दिसून येईल. व्यवसायातील अडथळे नातेवाईकांच्या मदतीने दूर होतील. पत्नीच्या शारीरिक समस्येमुळे खर्च वाढू शकतो. पण संध्याकाळी तिची तब्येत सुधारेल. मालमत्ता खरेदी करणार असाल तर सर्व कायदेशीर बाबींचा गांभीर्याने विचार करा. विद्यार्थ्यांनी आपल्या योजना मजबूत करण्यासाठी त्यावर एकाग्रतेनं काम करावं, तरच त्यांना यश मिळू शकेल.
Lucky Color : Red
Lucky Number : 4
मीन (Pisces) : श्री गणेश सांगतात, कौटुंबिक जीवन वेगळ्या उंचीवर पोहोचल्याने तुमचे मन प्रसन्न होईल. तुम्ही पार्टी करण्याच्या मूडमध्ये असाल. वैवाहिक जीवन आनंदी असेल. लांबचा प्रवास करू शकता. विद्यार्थ्यांचे मानसिक आणि बौद्धिक ओझं कमी होईल. कौटुंबिक व्यवसायासाठी तुम्हाला आई-वडिलांचा आशीर्वाद उपयोगी पडेल. मनावरचा ताण हलका होईल. संध्याकाळी फिरायला गेलात तर महत्त्वाची माहिती मिळू शकते.
Lucky Color : Dark Green
Lucky Number :