इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) चा 18 वा सिझन 2025 मध्ये खेळवला जाणार आहे. 2008 साली आयपीएलला सुरूवात झाली होती. आयपीएल (IPL) ही जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत टी20 लीग आहे. वर्षभर क्रिकेटप्रेमी आयपीएल सिझनची आतुरतेनं वाट पाहत असतात. आयपीएल 2025 मध्ये एकूण 10 टीम्स भाग घेत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स हा गतविजेता संघ आहे. आयपीएल 2024 चा 18 वा सिझन हा मार्च ते मे या महिन्यादरम्यान होत आहे. आयपीएलचं आयोजन भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) द्वारे केलं जातं. ज्यामध्ये जगभरातील क्रिकेट स्टार वेगवेगळ्या फ्रेंचाईजी टीममधून खेळतात. आयपीएल 2025 मध्ये 10 फ्रेंचाईजी टीम्स भाग घेतील. चेन्नई सुपरकिंग्ज्स (CSK)आणि मुंबई इंडियन्स (MI) हे दोन संघ आयपीएलच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी फ्रेंचाईजी टीम्स आहेत. दोन्ही टीम्सच्या नावावर प्रत्येकी पाच-पाच आयपीएल किताब आहेत