TRENDING:

Choco Lava Cake : चॉकलेट डेला फक्त चॉकलेट देण्यापेक्षा बनवा नो ओव्हन चॉको लावा केक! सोप्या रेसिपीने जिंका मन

Last Updated:

No oven eggless choco lava cake recipe in marathi : यावेळी तुम्ही फक्त चॉकलेट देण्यापेक्षा तुमच्या पार्टनरसाठी खास मिनीचॉको लावा केक बनवू शकता. निव्वळ चॉकलेट देण्यापेक्षा हा केक बनवून तुम्ही पार्टनरचे मन जिकू शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. रोज डे आणि प्रपोज डेनंतर तिसरा दिवस असतो चॉकलेट डे. चॉकलेट आपल्या पार्टनरला चॉकलेट देऊन साजरा केला जातो. मात्र यावेळी तुम्ही फक्त चॉकलेट देण्यापेक्षा तुमच्या पार्टनरसाठी खास मिनीचॉको लावा केक बनवू शकता. निव्वळ चॉकलेट देण्यापेक्षा हा केक बनवून तुम्ही पार्टनरचे मन जिकू शकता.
चॉकलेट डे स्पेशल रेसिपी
चॉकलेट डे स्पेशल रेसिपी
advertisement

आज आम्ही तुम्हाला इंस्टाग्रामवर Shivesh या अकाऊंवर शेअर केलेली एक रेसिपी सांगता आहोत. हा चॉको लावा केक तुम्ही अंडी आणि ओव्हनशिवाय बनवू शकता. आप्पे बनवण्याच्या पॅनमध्ये तुम्ही हे केक बनवू शकता. याची चवही इतकी अप्रतिम येईल की तुमचा दिवस आणखी गोड आणि रोमँटिक होईल.

चॉको लावा केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य..

advertisement

- 1/3 कप बारीक साखर (castor sugar)

- 2 टेबलस्पून वितळलेले बटर

- 1/2 कप कोमट दूध

- 3/4 कप मैदा

- 1/4 कप कोको पावडर

- 1/2 टीस्पून बेकिंग पावडर

- 10-12 चॉकलेटचे तुकडे

चॉको लावा केक बनवण्याची पद्धत..

- एका भांड्यात साखर आणि वितळलेले बटर घ्या. त्यानंतर चांगले फेटून घ्या.

advertisement

- चांगले मिसळल्यावर त्यात कोमट दूध घाला आणि पुन्हा मिसळा.

- नंतर तुमचे सर्व कोरडे घटक म्हणजे मैदा, कोको पावडर आणि बेकिंग पावडर घाला.

- सर्वकाही एकत्र करून बॅटर बनवा आणि पायपिंग बॅगमध्ये भरा.

- मिनी केक बनवण्यासाठी एक आप्पे पॅन गरम करा आणि ते तेलाने ग्रीस करा.

- पॅनमध्ये थोडे बॅटर घाला आणि नंतर त्याच्या मध्यभागी चॉकलेटचा तुकडा टाका.

advertisement

- चॉकलेटच्या तुकड्याच्या वरून पुन्हा थोडे बॅटर टाका आणि झाकन ठेऊन दोन्ही बाजूंनी चांगले शिजवा.

- नंतर केक पॅनच्या बाहेर काढून त्यावर थोडी आयसिंग शुगर घाला आणि गरमागरम सर्व्ह करा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तूर आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Choco Lava Cake : चॉकलेट डेला फक्त चॉकलेट देण्यापेक्षा बनवा नो ओव्हन चॉको लावा केक! सोप्या रेसिपीने जिंका मन
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल