TRENDING:

'आजारी पप्पांना माझ्या मांडीवर झोपवून...', 'बिग बॉस'च्या घरात फुटला अनुश्रीच्या अश्रूंचा बांध; वडिलांच्या आठवणीत ढसाढसा रडली अभिनेत्री

Last Updated:

Anushri Mane Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस'ने दिलेल्या एका टास्कमुळे अनुश्रीला आपल्या दिवंगत वडिलांची अशी काही आठवण आली की, तिला कॅमेऱ्यासमोर आपला हुंदका रोखता आला नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात सध्या एका बाजूला राखी सावंतची तुफान एंट्री घरातील सदस्यांना धडकी भरवत आहे, तर दुसरीकडे भावनांचे पाझरही फुटताना दिसत आहेत. खेळाच्या ओघात कधी कोणाची आठवण कोणाला रडवेल, हे सांगता येत नाही. असंच काहीसं घडलंय अभिनेत्री अनुश्रीसोबत. 'बिग बॉस'ने दिलेल्या एका टास्कमुळे अनुश्रीला आपल्या दिवंगत वडिलांची अशी काही आठवण आली की, तिला कॅमेऱ्यासमोर आपला हुंदका रोखता आला नाही.
News18
News18
advertisement

राकेशसोबतची जोडी अन् वडिलांचा भास

काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस'ने घरातील सदस्यांना जोड्यांमध्ये साखळीने बांधलं होतं. अनुश्रीची जोडी होती राकेशसोबत. पण योगायोग असा की, त्याच वेळी राकेशची प्रकृती खालावली होती. त्याला किडनी स्टोनचा प्रचंड त्रास होत होता आणि पायालाही दुखापत झाली होती. साखळीने बांधलेलं असल्यामुळे राकेश जिथे जाईल, तिथे अनुश्रीला जावं लागत होतं.

advertisement

'इमोशन्सचा बाजार मांडलाय', तन्वीचा पत्ता कट! तोंडाशी आलेला कॅप्टन्सीचा घास काढून घेतला, नेमकं काय घडलं?

टोळीसोबत गप्पा मारताना अनुश्रीने यामागची एक हळवी गोष्ट सांगितली. ती म्हणाली, "जेव्हा मी राकेश दादासोबत साखळीने बांधली गेले होते, तेव्हा तो खूप वेदनेत होता. त्याला चालतानाही त्रास व्हायचा. त्याला तशा अवस्थेत पाहून मला सतत माझे पप्पा आठवत होते. माझे वडीलही सतत आजारी असायचे. मला असं वाटत होतं की, मी माझ्या पप्पांच्या मागे-मागे फिरतेय आणि त्यांची काळजी घेतेय."

advertisement

मुंबईचा प्रवास अन् टाटा हॉस्पिटलची ती आठवण...

अनुश्रीने आपल्या संघर्षाचे दिवस आठवत एक हृदयद्रावक किस्सा सांगितला. ती म्हणाली, "पप्पांच्या उपचारांसाठी मी आणि मम्मी त्यांना घेऊन गावोगाव फिरायचो. एकदा पप्पांना टाटा हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी आम्ही मुंबईला येत होतो. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती, बसायला जागा नव्हती. तेव्हा पप्पांना माझ्या मांडीवर झोपवून, त्यांना थोपटत मी तो प्रवास पूर्ण केला होता." अनुश्री पुढे भावूक होत म्हणाली की, राकेशला त्रास होत असताना मलाही शारीरिक थकवा जाणवत होता, पण वडिलांच्या आठवणीमुळे माझी त्याला 'नाही' म्हणण्याची हिंमतच झाली नाही. केवळ माणुसकी आणि वडिलांबद्दलच्या प्रेमापोटी तिने तो त्रास निमूटपणे सहन केला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षणाची जोड अन् जिद्दीची भरारी,माय-लेकाने सुरु केला व्यवसाय, कमाई तर पाहा
सर्व पहा

अनुश्रीची ही व्यथा ऐकून घरातला रांगडा गडी रोशनही हळवा झाला. त्याने अनुश्रीचं सांत्वन करताना एक अत्यंत मोलाचं विधान केलं. रोशन म्हणाला, "बापाचं छत्र हरपलं की माणसाला काहीच सुचत नाही. बाप कसाही असला तरी चालेल, पण घरात बाप असायलाच हवा." रोशनच्या या वाक्याने घरातील वातावरण अधिकच गंभीर आणि भावूक झालं होतं.

मराठी बातम्या/मनोरंजन/
'आजारी पप्पांना माझ्या मांडीवर झोपवून...', 'बिग बॉस'च्या घरात फुटला अनुश्रीच्या अश्रूंचा बांध; वडिलांच्या आठवणीत ढसाढसा रडली अभिनेत्री
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल