सध्या बिग बॉसच्या घरात एकूण 15 स्पर्धक आहेत. प्रत्येकाच्या खेळावरून, त्यांच्या वागण्यावरून- बोलण्यावरून अशा प्रत्येक गोष्टींवर रितेश भाऊने स्पर्धकांना खडेबोल सुनावले आहेत. अलीकडच्याच एका एपिसोडमध्ये दिव्या शिंदेने स्पर्धकांना दिलेल्या तलवारीच्या धमकीमुळे तिला काल घरातून एलिमिनेट व्हावं लागलं होतं. यामुळेही खेळण्यावरून रितेश यांनी स्पर्धकांना समजावून सांगितलं आहे. टास्क खेळताना वारंवार सर्वच स्पर्धक खेळाच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. या सर्वांमुळे रितेश यांनी सर्व स्पर्धकांना नियमांबद्दल समजवताना दिसले.
advertisement
गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात चोरी प्रकरणामुळे खूपच वादंग निर्माण झाले होते. रितेश देशमुख यांनी आजच्या एपिसोडमध्ये अखेर या प्रकरणावर भाष्य केले आहे. चौथ्या एपिसोडमध्ये कोणत्या स्पर्धकाने घरामध्ये चोरी केली आहे, याचा व्हिडिओच सर्व स्पर्धकांना दाखवला आहे. चौथ्या आठवड्यात झालेल्या चोरीची जबाबदारी कोणीच घेतली नव्हती. रेशन चोरीला गेलं होतं आणि ते सामान विशाल आणि रोशनला तन्वीच्या बेडजवळ सापडल्याचं दाखवण्यात आलं. तन्वी कोलते, विशाल कोटियन, राकेश बापट, ओमकार राऊत, प्रभू शेळके हे सर्व चोरी करताना त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसले आहेत.
चौथ्या आठवड्याच्या नॉमिनेशनची प्रक्रिया सुरू झाली असून, दिव्या शिंदेला नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बाहेर काढण्यात आले आहे. दुसरं नॉमिनेशन सुद्धा बिग बॉसच्या घरात पार पडणार आहे. रविवारी रितेश देशमुख 'भाऊचा धक्का' वर दुसऱ्या स्पर्धकाला बिग बॉसच्या घरातून नॉमिनेट करणार आहे. ओमकार राऊत, आयुष संजीव आणि तन्वी कोलते हे स्पर्धक एलिमिनेट झाले असून यांच्यापैकी एक स्पर्धक रविवारच्या एपिसोडमध्ये घराबाहेर पडणार आहे.
