एव्हिक्शनच्या वेळी, रितेश भाऊंनी दोन वेगवेगळ्या गटांतील सदस्यांना पुढे बोलवलं होतं. यामध्ये पहिल्या गटातून अनुश्री, प्रभू, राकेश आणि आयुष अशा चौघांना पुढे बोलवलं होतं. प्रत्येका पुढे एक एक बॉक्स समोर ठेवला होता. त्यामध्ये आपआपल्या नावाची पाटी होती. ज्याच्या पेटीमध्ये ते नाव नसेल, तो सदस्य डेंजर झोनमध्ये जाणार, असं समजलं जाईल. पहिल्या ग्रुपमध्ये आयुष संजीव डेंजर झोनमध्ये गेला. दुसऱ्या ग्रुपमधून रितेश भाऊंनी ओमकार, सचिन, दिपाली आणि रोशन यांना पुढे बोलवलं होतं. यामधून डेंजर झोनमध्ये ओमकार गेला होता.
advertisement
ओमकार आणि आयुषला कमी मतं मिळाल्यामुळे हे दोघंही डेंझर झोनमध्ये गेले होते. यातून एका स्पर्धक चौथ्या आठवड्यामधून घराबाहेर जाणार आहे. खरंतर, चौथ्या आठवड्यात डबल एव्हिक्शन पार पडणार आहे. पण शुक्रवारी दिव्या शिंदे घराच्या बाहेर गेल्यानंतर आठवड्याच्या शेवटी एकच स्पर्धक घराबाहेर गेला. ओमकार आणि आयुषमध्ये घरातल्या स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांनीही कमी मतं देऊन ओमकार राऊतला नॉमिनेट केलं आहे. आयुष संजीव सेफ असून तो पाचव्या आठवड्यामध्ये खेळणार आहे. बिग बॉसच्या घरात पाचव्या आठवड्यामध्ये एका वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. आता कोण असणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
