सध्या हमासचा नेता इस्माईल हानिया हा मोसादच्या हिटलिस्टवर आहे. या पूर्वीही मोसादने आपल्या हिटलिस्टवरील व्यक्तींचा काटा काढण्यासाठी प्रसंगी देशाबाहेर जाऊनही अनेक कारवाया यशस्वी केल्या आहेत.
अमेरिकी गुप्तचर संघटना ‘सीआयए’ ने ही इस्रायली मोसादचं मोठेपण मान्य केलेलं आहे. दोन्ही देशांच्या राजकीय नेतृत्वामुळे दोन्ही गुप्तचर संघटनांमध्ये समन्वय आहे. अमेरिकन सिनेमे आणि वेबसीरिजसुद्धा मोसाद आणि सीएआयए मिळून काम करत असल्याचं सर्रास दाखवतात. दोन्ही देशांचे मित्र आणि शत्रूही तसे सारखेच असल्यामुळे त्यांचं अनेक बाबतीत एकमत आहे. मोसादच्या अनेक कारवाया बहुतेक वेळा गुलदस्त्यातच राहतात. सगळ्याच कारवायांची माहिती समोर आली असं सर्रास होत नाही. मोसादला ज्या कारवाईबाबत जगाला माहिती असावी असं वाटतं, तेव्हाच ती माहिती जगासमोर येते असंही म्हणता येईल.
advertisement
इराणसारख्या शत्रुदेशात इस्माईल हानियाची हत्या करण्यापूर्वी मोसादने 2010 मध्ये दुबईमध्ये महमूद अल मबूह याची हत्या केली होती. अल मबूह हा मोसादसाठी शस्त्रास्त्रांच्या वाटाघाटी करत असे. मोसादची हिट स्क्वॉड म्हणून ओळखल्या गेलेल्या एजंट्सनी दुबईत लपलेल्या अल मबूहच्या हॉटेलमध्ये त्याच्या समोरच्या खोलीत मुक्काम ठोकला आणि त्याच्या तोंडावर उशी दाबून त्याचा जीव घेतला असं म्हणतात. त्या पूर्वी त्याला एक इंजेक्शन देऊन पॅरेलाईज करण्यात आलं होतं अशीही त्यावेळी चर्चा होती.
सातव्या शतकात मोसदचं ‘रेथ ऑफ गॉड’ हे मिशनही खूप रक्तरंजित होतं. देवाचा कहर असा या नावाचा अर्थ होतो आणि मोसादने या मिशनमध्ये खरोखरीच कहर केला. इस्रायली खेळाडूंबाबत पॅलेस्टाईनने जे केलं ते क्रुर होतं. म्युनिक ऑलिम्पिकमध्ये पॅलेस्टाईनने इस्रायलच्या 11 खेळाडूंचा जीव घेतला होता. ब्लॅक सप्टेंबर या नावाने हे हत्याकांड पॅलेस्टाईनने घडवून आणलं होतं. त्यानंतर इस्रायलने या हत्याकांडाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला शोधून शोधून मारल्याचं जगाला ज्ञात आहे. म्युनिकमधील घटनेनंतर इस्रायलने आपल्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेची जबाबदारी मोसादवर सोपवली असं म्हटलं जातं, त्यामुळे मोसादचे अधिकारही वाढले.
अगदी अलीकडे म्हणजे 2020 मध्ये मोसादने इराणचे अणुशास्त्रज्ञ ब्रिगेडियर जनरल मोहसीन फकरी जादेह यांची हत्या केली. मोसादच्या बहुचर्चित कारवायांपैकी ती एक मानली जाते. ‘ऑपरेशन थंडर बोल्ट’ ही देखिल मोसादची एक बहुचर्चित कारवाई आहे. अरब दहशतवाद्यांनी 94 इस्रायली नागरिक प्रवास करत असलेल्या विमानाचं अपहरण केलं. त्यांच्याशी बोलणी सुरु असताना त्यांच्यावर हल्ला करून मोसादने त्या सर्व दहशतवाद्यांचा जीव घेतला आणि आपल्या नागरिकांची सहीसलामत सुटका केली. यात राष्ट्रपती बेंजामिन नेतान्याहू यांच्या भावाचा जीव गेला होता. 1965 मध्ये उरुग्वेमध्ये लॅटव्हियन नाझींचे सहकारी हृबट चुकरुस याची हत्या मोसादने घडवून आणली होती. इस्रायली शास्त्रज्ञ वनुनु यांना मायदेशी सुरक्षित परत नेऊन शिक्षा देण्यासाठी मोसादने हनी ट्रॅपचा वापर केला होता. सिंडी नावाच्या एका महिलेने वनुनु यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना इस्रायलला परत आणलं होतं.
मोसादच्या कारवाया थक्क करतात. 1968 मध्ये मिग 21 या लढाऊ विमानाची टेक्निक्स समजून घेण्यासाठी मोसादने चक्क एका मिग 21 चं अपहरण केलं होतं. विशेष म्हणजे हे टेक्निक जाणून घेण्यात अमेरिकन सीआयएलाही यश आलं नव्हतं. मात्र, या मोहिमेत मोसादचा एक एजंट पकडला गेला होता. पॅलेस्टिनी नेते यासर अराफत यांचा सहकारी खलील अल वजीर याची हत्या ट्युनिशियामध्ये करण्यात आली होती. त्यासाठी मोसादचे एजंट्स प्रवासी म्हणून ट्युनिशियामध्ये गेले होते.
मोसादचं हेडक्वॉर्टर इस्रायलची राजधानी असलेल्या तेल अवीव शहरात आहे. मोसादची स्थापना 13 डिसेंबर 1949 ला झाली होती. देशाचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांनी तिची स्थापना केली होती. इस्रायली पॅलेस्टिनींना दहशतवादी मानतात. त्यामुळे सुरुवातीपासून मोसादचा सर्वाधिक संघर्ष पॅलेस्टाईनशी झाला. मोसादचं प्रशिक्षणही अत्यंत खडतर असतं. पूर्वी मोसाद हग्गाना या नावाने ओळखली जात असे. सध्या डेव्हिड बरनिया मोसादचे प्रमुख आहेत. मोसाद जगातील सर्वोत्तम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करते.