डॉ. मिश्र यांनी सांगितलं की जेव्हा कुणी देहदान करतं तेव्हा मृतदेह एनाटॉमी विभागात आणला जातो, कारण एमबीबीएसचं शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हा विषय असतो. मृतदेहाची चिरफाड म्हणजेच डिसेक्शनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शारिरिक संरचना आणि शरिराच्या वेगवेगळ्या भागाच्या शस्त्रक्रियेची प्रक्रिया शिकवली जाते.
बॉडी सुरक्षित करणे
मृत्यूच्या एक ते दोन दिवसांमध्येच मृतदेहाच्या सडण्याची प्रक्रिया सुरू होते. मृतदेहावर बॅक्टेरिया जमा व्हायला सुरूवात होते, त्यामुळे दान केलेला मृतदेह सगळ्यात आधी सुरक्षित केला जातो. मृतदेह सुरक्षित करण्यासाठी अनेक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, यात एक असते थील टेकनिक. यामध्ये मृतदेहावर एक लेप लावला जातो. हा लेप लावल्यामुळे मृतदेह नरम राहतो आणि त्याच्यामध्ये बॅक्टेरिया जमा होत नाहीत. थील टेकनिकमुळे मृतदेहातून दुर्गंधीही कमी येते, यामुळे विद्यार्थ्यांना मृतदेहाला स्पर्श करताना तसंच कापताना आणि पकडताना अडचणींचा सामना करावा लागत नाही. याशिवाय मृतदेहावर फॉर्मेलिनही लावलं जाऊ शकतं. फॉर्मेलिनही मृतदेहाला नरम आणि प्राकृतिक स्वरुपात ठेवायला मदत करते.
advertisement
सोबतच मृतदेहामध्ये एक सोल्युशनही इंजेक्ट केलं जातं, त्यामुळे जेवढा काळ बॉडीला ठेवायचं आहे, तेवढं ठेवता येतं. तसंच मृतदेहही खराब होत नाही.
मृतदेहाचं डिसेक्शन
मृतदेह सुरक्षित केल्यानंतर त्याला मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आणला जातो. यानंतर विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागणी केली जाते आणि त्यांना मृतदेहाच्या शरिराची वेगवेगळी अंग डिसेक्शन करण्यासाठी दिली जातात. एनाटॉमीमध्ये मान, पोट, हात, पाय सगळ्यांचं डिसेक्शन करून शरिरामध्ये असलेले वेगवेगळे बारकावे विद्यार्थ्यांना शिकवले जातात. मृतदेहाचा पूर्ण वापर केला जात नाही, तोपर्यंत हे केलं जातं. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासासोबतच रिसर्च वर्कही पूर्ण होतं.
हाडं काढली जातात
मृतदेहाचं डिसेक्शन केल्यानंतर शरिरात असलेली हाडं काढली जातात. या हाडांचाही मेडिकलचे विद्यार्थी अभ्यास करतात, तर इतर शरीर डिस्पोज ऑफ केलं जातं.
पार्थिव कुटुंबाला दिलं जातं?
देहदान केल्यानंतर मृतदेह कुटुंबाला परत दिला जात नाही. तसंच कुटुंबही रुग्णालयाकडे मृतदेह मागण्यासाठी अर्ज करू शकत नाहीत. जर कुणी अस्थी मागितल्या तर हॉस्पिटल देऊ शकते.
मृतदेहाचे अंत्यसंस्कार होतात?
डिसेक्शननंतर शरिरातली हाडं काढली जातात, यानंतर मृतदेहामध्ये असं काहीच उरत नाही, ज्याच्यावर अंत्यसंस्कार करू शकतो. हॉस्पिटलच्या नियमानुसार डेडबॉडी डिस्पोज ऑफ केली जाते, असं डॉ. मिश्र यांनी सांगितलं.
मृतदेह किती वर्ष वापरू शकतो?
इंग्लंडमध्ये मृतदेह जास्तीत जास्त 7 वर्ष ठेवण्याचा नियम आहे, पण भारतात असा कोणताही नियम नाही. जेव्हा 50-100 विद्यार्थी मिळून पूर्ण शरिराचं डिसेक्शन करतात तेव्हा हा मृतदेह फक्त एक सेशनच वापरला जाऊ शकतो, असं डॉ मिश्र यांनी सांगितलं.
देहदान केल्याचा फायदा काय?
एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी देहदान उपयोगी आहे. एमबीबीएसच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या सुरुवातीच्या एनाटॉमीच्या शिक्षणात डिसेक्शन करावं लागतं, त्यामुळे त्यांना मृतदेह गरजेचा असतो, असं डॉ. मिश्र म्हणाले.