जगातल्या सर्वांत मोठ्या विमान अपघाताविषयी बोलायचं झालं तर हा अपघात 27 मार्च 1977 रोजी लॉस रोडिओस विमानतळावर झाला होता. यात पॅन एअर आणि केएलएम एअरलाइन्सच्या विमानांची समोरासमोर धडक झाली होती. या अपघातात एकूण 583 प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला होता. यात केएलएमचे 234 प्रवासी आणि 14 क्रू मेंबर्सचा समावेश होता. या अपघातात पॅनच्या 396 पैकी 335 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
advertisement
पर्वताला धडकलं होतं विमान; झाला होता 520 जणांचा मृत्यू
जगातला दुसरा सर्वांत मोठा विमान अपघात 12 ऑगस्ट 1985 रोजी टोकियोपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर झाला होता. जपान एअरलाइन्सच्या विमानाने 123 प्रवाशांना घेऊन टोकियोवरून ओसाकाला जाण्यासाठी उड्डाण केलं. उड्डाण केल्यावर सुमारे 32 मिनिटांनी हे विमान ताकामागहारा पर्वताला धडकलं होतं. या अपघातात विमानातल्या 520 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात 509 प्रवासी आणि 15 क्रू मेंबर्सचा समावेश होता. हा अपघात आत्तापर्यंतचा सर्वांत भीषण मानला जातो. कारण यात एकाच विमानातल्या सर्वाधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
हवेत झाली होती विमानांची टक्कर; 349 जणांचा झाला होता मृत्यू
जगातला तिसरा सर्वांत मोठा विमान अपघात दिल्लीत चरखी दादरी इथे झाला होता. 12 नोव्हेंबर 1996 रोजी झालेल्या या अपघातात चिमकंदहून दिल्लीला येणाऱ्या कझाकस्तान एअरलाइन्सच्या 1907 या विमानाची आणि दिल्लीहून धहरानला जाणाऱ्या 763 या सौदी एअरलाइन्सच्या विमानाची टक्कर झाली होती. या दुर्घटनेत 349 जणांचा मृत्यू झाला होता. हा विमान अपघात हवेत घडलेल्या सर्वांत भीषण दुर्घटनांपैकी एक आहे. या अपघातात विमानातले सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले होते.
पॅरिसच्या जंगलात कोसळलं होतं विमान; 346 जणांचा झाला होता मृत्यू
जगातला चौथा सर्वांत मोठा विमान अपघात तुर्की एअरलाइन्सशी संबंधित आहे. तुर्की एअरलाइन्सच्या 981 या विमानानं ओर्ली विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केलं होतं. उड्डाण करताच काही वेळाने विमानाच्या कार्गोचं दार विमानापासून वेगळं झालं. त्यामुळे मोठा स्फोट झाला. यानंतर विमानाचा वरचा भाग कोसळला होता. काही वेळानं हे विमान पॅरिसच्या ईशान्येकडच्या जंगलात कोसळलं. या अपघातात विमानातल्या सर्व 346 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
आयर्लंडमध्ये कोसळलं होतं एअर इंडियाचं विमान; 329 जणांचा गेला होता बळी
जगातली सर्वांत मोठी विमान दुर्घटना भारताच्या एअर इंडियाशी संबंधित आहे. 23 जून 1985 रोजी 182 या एअर इंडियाच्या विमानाने टोरांटोकडे उड्डाण केलं. हे विमान मॉन्ट्रियलवरून लंडनमार्गे दिल्लीत पोहोचणार होतं. आयर्लंडच्या नैर्ऋत्य किनारपट्टीनजीक विमानाच्या कार्गोत अचानक मोठा स्फोट झाला आणि विमान कोसळलं. या अपघातात विमानातले सर्व 307 प्रवासी आणि 22 क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला होता.