माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांनुसार, 23 जुलै 2014 रोजी तैवानमध्ये ट्रान्सएशिया एअरवेजच्या फ्लाइट 222चा अपघात झाला होता. या विमानाने तैवानमधल्या काओशुंग विमानतळावरून उड्डाण केलं आणि ते पेंगू बेटावरील मागोंग विमानतळावर उतरणार होतं. फ्लाइटमध्ये चार लहान मुलांसह 54 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. ली यी-लियांग या विमानाचे कॅप्टन होते, तर चियांग कुआन-हिंग फर्स्ट ऑफिसर होते. या अपघातात दोन फ्रेंच नागरिक आणि तैवानच्या 46 नागरिकांसह 48 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तैवानमधले बिझनेसमन येह केन-चुआंग यांचाही समावेश होता.
advertisement
खराब हवामानामुळे विमानाने उशिरा उड्डाण केलं होतं. तिकडे मागोंग विमानतळावरचं हवामानदेखील खराब होतं आणि व्हिजिबिलिटी अतिशय कमी होती. त्यामुळे काओशुंग ॲप्रोच कंट्रोलने फ्लाइट 222 ला तीन इतर फ्लाइट्ससह होल्डिंग पॅटर्नमध्ये राहण्याची सूचना दिली. फ्लाइट 222च्या क्रूने रनवे 20 वर उतरण्याची परवानगी मागितली. काओशुंग ॲप्रोच कंट्रोलने विमान कमी उंचीवर आणि रडार वेक्टरवर ठेवलं. विमानाला उतरण्याची परवानगी मिळाली.
क्रू मेंबर्सनी ऑटोपायलट आणि यॉ डॅम्पर वेगळं केलं. पायलट रनवेचा शोध घेत असतानाच आपण डावीकडे वळल्याचं त्याच्या लक्षात आलं. फर्स्ट ऑफिसर आणि कॅप्टनने गो-अराउंड केलं. त्यामुळे विमान जमिनीवर आदळणं निश्चित होतं. विमान प्रथम एका इमारतीला धडकलं आणि नंतर झाडांमधून मार्ग काढून जिक्सी गावात पडलं. विमानाचा स्फोट होऊन आग लागली. काही प्रवाशांचे मृतदेह गावातल्या रस्त्यावर आढळून आले. गावकऱ्यांनी प्रयत्न करून काही प्रवाशांचा जीव वाचवला.
तैवानमधल्या एव्हिएशन सेफ्टी कौन्सिलच्या (एएससी) नेतृत्वाखालच्या पथकाने या अपघाताची चौकशी केली होती. फ्लाइट रेकॉर्डरची तपासणी केल्यानंतर लक्षात आलं की, पायलटने शेवटच्या क्षणी फ्लाइट अबॉर्ट करण्याची आणि गो-अराउंडची घोषणा केली. या वेळी पायलटच्या बाजूचं इंजिन तुटलं. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये विमान झाडांवर आदळलं तेव्हाचे आवाज रेकॉर्ड झाले होते. पायलटची घोषणाच या अपघाताला कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला.