लिंग परिवर्तनाबाबतच्या एका वृत्तानं लोकांची उत्सुकता वाढली आहे. हैदराबादमधली अनुकाथीर सूर्या नावाची आयआरएस महिला अधिकारी लिंग परिवर्तन करून पुरुष बनली. या महिलेनं लिंग परिवर्तन करण्याबाबत केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती. परवानगी मिळाल्यावर तिने लिंग परिवर्तनाची प्रक्रिया सुरू केली आणि ती 'श्रीमती'ची 'श्री' बनली. या महिलेनं पुरुष बनल्यावर कागदपत्रांवरचं नावदेखील बदललं आहे.
advertisement
लिंग परिवर्तनाची प्रक्रिया जोखमीची मानली जाते. लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया केल्यावर महिला पुरुष बनली, तर परत महिला बनू शकत नाही. ती मुलांना जन्म देऊ शकत नाही. या शस्त्रक्रियेनंतर संसर्गाचा धोका वाढतो. हॉर्मोनल बदल झाल्यामुळे लिंगबदल केलेल्या व्यक्तीला मानसिक आजार होण्याची शक्यता असते.
लिंग परिवर्तन प्रक्रियेला जेंडर रिअसाइनमेंट सर्जरी असं म्हटलं जातं. ज्या व्यक्तींना जेंडर आयडेंटिटी डिसॉर्डर आहे, त्या व्यक्तींचंच लिंग परिवर्तन होऊ शकतं. याचा अर्थ ज्या व्यक्तींना जेंडर डिसफोरिया असतो, त्या व्यक्ती ही प्रक्रिया करू शकतात. जेंडर डिसफोरियामध्ये स्त्रीला पुरुषासारखं जगायचं असतं, तर पुरुषाला स्त्री सारखं जगायचं असतं. जेंडर डिसफोरियाची लक्षणं व्यक्तीमध्ये 10 ते 11 वर्षं वयापासून दिसू लागतात. जर एखादा मुलगा असेल तर त्याला मुलींसारखे कपडे परिधान करायला आवडतं. मुलींसारखं बोलायला आणि वागायला तो सुरुवात करतो. मुलींना मुलांसारखं राहायला आवडतं. वयाच्या 18 वर्षांनंतर त्या व्यक्तीत सायकॉलॉजिकल असेसमेंट होते आणि त्या व्यक्तीला जेंडर डिसफोरिया असेल तर लिंग परिवर्तन करण्यासाठी वैद्यकीय प्रक्रिया करण्यास परवानगी दिली जाते.
वाचा - चाणक्यनीती : चेहऱ्यावर जाऊ नका 'हे' बघा; त्यावरून समजेल किती सुंदर आहे ती महिला
लिंग परिवर्तनाची प्रक्रिया ही दीर्घ काळ चालणारी आणि खर्चिक मानली जाते. सायकॉलॉजिकल असेसमेंटनंतर रुग्णाला हॉर्मोन थेरपी दिली जाते. त्याच्या शरीरातली हॉर्मोन्स बदलण्यासाठी इंजेक्शनच्या माध्यमातून औषधं दिली जातात. हॉर्मोनल बदल झाल्यावर शस्त्रक्रिया केली जाते. महिलेला पुरुष बनायचं असेल तर 33 प्रकारच्या वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. पुरुषाला महिला बनायचं असेल तर त्याला 18 वैद्यकीय प्रक्रियांमधून जावं लागतं.
हॉर्मोनल बदल झाल्यावर शस्त्रक्रियेच्या मदतीनं महिला किंवा पुरुषाच्या गुप्तांगाचा आकार बदलला जातो. तसंच रुग्णाचा चेहरा, केस, कानाचा आकार, नखाचा आकारदेखील बदलला जातो. जर पुरुष महिला बनण्यासाठी प्रक्रिया करत असेल तर त्याच्या शरीरातल्या मांसाच्या मदतीने स्तन तयार केले जातात. ही शस्त्रक्रिया सुमारे चार ते पाच तास चालते. काही पुरुष महिला बनण्यासाठी सर्व प्रक्रिया न करता केवळ आवश्यक प्रक्रिया पूर्ण करतात.
18 प्रक्रिया पूर्ण करायच्या असतील तर त्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागतो. जर महिलेला पुरुष बनायचं असेल तर तसं गुप्तांग तयार करणं, त्याला आकार देणे, स्तन काढून टाकणं, इतर अवयवांना आकार देणं ही कामं गुंतागुंतीची असतात. या प्रक्रियेला खूप वेळ लागतो. तसंच खर्चदेखील जास्त येतो.