TRENDING:

Paetongtarn Shinawatra: थायलंडमध्ये राजकीय भूकंप, देशाला मिळाल्या 37 वर्षांच्या तरुण पंतप्रधान

Last Updated:

विशेष म्हणजे, त्या केवळ 37 वर्षांच्या असून देशाच्या सर्वांत तरुण पंतप्रधान आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  थायलंडच्या घटनात्मक न्यायालयाने तत्कालीन पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांना बडतर्फ केल्यानंतर आता तिथल्या संसदेनं पायतोंगतार्न शिनावात्रा यांची पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. त्या 37 वर्षांच्या असून थायलंडच्या सर्वांत तरुण पंतप्रधान आहेत.
News18
News18
advertisement

थायलंडच्या संसदेनं पायतोंगतार्न शिनावात्रा यांची पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. अब्जाधीश व्यावसायिक आणि माजी पंतप्रधान थाकसिन यांच्या त्या कन्या आहेत. विशेष म्हणजे, त्या केवळ 37 वर्षांच्या असून देशाच्या सर्वांत तरुण पंतप्रधान आहेत. त्यांच्या काकू यिंगलक यांच्यानंतर या पदावर विराजमान होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत.

बीबीसीनं दिलेल्या माहितीनुसार, शिनावात्रा यांची निवड माजी पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांना घटनात्मक न्यायालयानं बडतर्फ केल्यानंतर दोन दिवसांनी करण्यात आली आहे. ते दोघंही फेउ थाई पक्षाचे सदस्य आहेत. 2023 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता, मात्र त्यांनी सत्ताधारी आघाडी स्थापन केली.

advertisement

थायलंडच्या नव्या पंतप्रधान म्हणून पायतोंगतार्न यांच्या समोर अनेक आव्हानं आहेत. थायलंडच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचं, लष्करातील उठाव आणि न्यायालयीन हस्तक्षेप टाळण्याचं कठीण काम त्यांना करावं लागणार आहे. याच कामांमुळे त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखालील चार सरकारं कोसळली होती.

पायतोंगतार्न यांना आज शुक्रवारी (16 ऑगस्ट) त्यांच्या समर्थनार्थ 319 आणि त्यांच्या विरोधात 145 मतं मिळाली आहेत. गेल्या दोन दशकांमध्ये पंतप्रधान बनणाऱ्या शिनावात्रा त्यांच्या कुटुंबातील चौथ्या सदस्य आहेत. त्यांचे वडील थाकसिन आणि काकू यिंगलक यांच्यासह तीन सदस्यांना लष्करातील उठाव किंवा घटनात्मक न्यायालयाच्या निर्णयांमुळे पदावरून हटवण्यात आलं होतं.

advertisement

याच घटनात्मक न्यायालयाने बुधवारी (14 ऑगस्ट) श्रेथा थाविसिन यांना बडतर्फ केलं. एकेकाळी तुरुंगात असलेल्या एका माजी वकीलाची मंत्रिमंडळात नियुक्ती केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.

पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून नाव पुढे आल्यावर पायतोंगतार्न यांनी गुरुवारी (15 ऑगस्ट) फ्यू थाईच्या मुख्यालयातून मीडियाशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, की श्रेथा यांचं काम कौतुकास्पद आहे. त्यांची बडतर्फी हा अतिशय दुर्दैवी निर्णय आहे.

advertisement

पायतोंगतार्न यांचं शिक्षण थायलंडमधील कुलीन शाळांमध्ये व नंतर ब्रिटनमधील विद्यापीठात झालं आहे. त्यानंतर काही वर्ष त्यांनी शिनावात्रा कुटुंबाच्या रेन डे हॉटेल ग्रुपमध्ये काम केलं. त्यांचे पती तिथेच उपमुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून काम करतात. पायतोंगतार्न या 2021 मध्ये फ्यू थाई या पक्षात आल्या व ऑक्टोबर 2023 मध्ये त्यांना पक्षातील नेत्या म्हणून नियुक्त करण्यात आलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शब्दांचा जादुगार! मराठी कविता 32 भाषांत अन् गुजराती अभ्यासक्रमात, कवी कोण?
सर्व पहा

पायतोंगतार्न यांच्या नियुक्तीमुळे थायलंडच्या सर्वोच्च नेतृत्वाला नवी ऊर्जा मिळाली आहे. पक्षाचं राजकीय भवितव्य पुनरुज्जीवित करण्यास त्यामुळे मदत होईल अशी पक्ष सदस्यांची अपेक्षा आहे. पायतोंगतार्न शिनावात्रा या थायलंडच्या सर्वांत तरुण पंतप्रधान आहेत. त्यांना देशातील अनेक आव्हानांना सामोरं जायचं आहे.

मराठी बातम्या/Explainer/
Paetongtarn Shinawatra: थायलंडमध्ये राजकीय भूकंप, देशाला मिळाल्या 37 वर्षांच्या तरुण पंतप्रधान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल