TRENDING:

DIY Growth Oil : फक्त एक महिना 'हे' खास तेल वापरा, भुवया आणि पापण्या होतील जाड! थांबलेली वाढ पुन्हा होईल..

Last Updated:

DIY hair growth oil for eyelash and eyebrows : आज आम्ही तुम्हाला असाच एक घरगुती उपाय सांगत आहोत. यासाठी तुम्हाला घरातील खूप सामान्य आणि सहज उपलब्ध असणारं साहित्य लागेल. हा उपाय सांगितला आहे डॉ. प्रियंका अभिनव यांनी.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्रत्येकाला वाटते आपल्या भुवया आणि पापण्या जाड, सुंदर आणि आकर्षक असाव्या. जाड आणि दात भुवया आणि पापण्यांमुळे डोळ्यांचे सौंदर्य वाढते आणि त्यामुळे आपला आत्मविश्वासही वाढतो. मात्र कधीकधी धूळ, रासायनिक मेकअप उत्पादने किंवा आरोग्य समस्यांमुळे पापण्या आणि भुवयांचे केस गळू लागतात. अशा परिस्थितीत लोक त्यांच्या वाढीसाठी विविध तेल आणि घरगुती उपाय वापरून पाहतात.
पापण्या आणि भुव्यांच्या वाढीसाठी नारळ तेलाचे फायदे..
पापण्या आणि भुव्यांच्या वाढीसाठी नारळ तेलाचे फायदे..
advertisement

आज आम्ही तुम्हाला असाच एक घरगुती उपाय सांगत आहोत. यासाठी तुम्हाला घरातील खूप सामान्य आणि सहज उपलब्ध असणारं साहित्य लागेल. हा उपाय सांगितला आहे डॉ. प्रियंका अभिनव यांनी. डॉ. प्रियंकाने त्यांच्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये एका अद्भुत नारळ तेलाचा उपाय शेअर केला आहे. या उपायाने महिन्याभरात तुम्हाला जाड आणि दात भुवया आणि पापण्या मिळतील.

advertisement

भुवया आणि पापण्यासाठीचे तेल बनवण्यासाठी लागणारे साहित्य

- 1 चमचा नारळ तेल

- 1/2 चमचा एरंडेल तेल

- 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल

तेल बनवण्याची पद्धत

हे खास तेल तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात नारळ तेल घ्या. आता या नारळ तेलात एरंडेल तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला. सर्व साहित्य पूर्णपणे मिसळा आणि हे मिश्रण मस्कराच्या बाटलीत भरून ठेवा. रोज झोपण्यापूर्वी हे तेल लावा. तुम्हाला 1 महिन्याच्या आत सकारात्मक परिणाम दिसतील.

advertisement

भुवया आणि पापण्यांवर हे तेल कसे वापरावे?

- रात्री चेहरा स्वच्छ करा. नंतर कापसाच्या बोळ्याने किंवा स्वच्छ मस्करा ब्रशने तुमच्या पापण्या आणि भुवयांना तेल लावा. तेल तुमच्या डोळ्यांत जाणार नाही याची काळजी घ्या. ते रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून 3-4 वेळा ते लावल्याने काही दिवसांतच परिणाम दिसून येतील.

advertisement

उपायाचे फायदे

पापण्या आणि भुवयांवर हे तेल लावल्याने भुवया पुन्हा वाढतील, पापण्या वाढण्यासही मदत होईल, भुवयांचे केस काळे होतील, भुवया मॉइश्चराइज होतात, या तेलाने भुवयांना बळकटी मिळते आणि भुवया जाड दाट दिसतात.

पापण्या आणि भुव्यांच्या वाढीसाठी नारळ तेलाचे फायदे..

- नारळ तेल त्याच्या मॉइश्चरायझिंग गुणधर्मांसाठी ओळखले जाते. त्यात असलेले फॅटी अॅसिड केस तुटण्यापासून रोखतात आणि मुळांना पोषण देतात. पापण्या किंवा भुव्यांना लावल्यावर ते प्रत्येक केसाला आवरण देते, ज्यामुळे केस मऊ, मजबूत आणि चमकदार राहतात.

- त्यात असलेले व्हिटॅमिन ई, लॉरिक अॅसिड आणि प्रथिने केसांच्या मुळांना आतून मजबूत करतात.

- वारंवार पापण्या गळत असतील किंवा भुवयांमध्ये अंतर येत असेल, तर झोपण्यापूर्वी नारळाच्या तेलाने हलका मालिश करणे फायदेशीर आहे.

- सातत्याने वापरल्याने केसांची वाढ तर होतेच पण केसांचा पोतही सुधारतो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तूर आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
DIY Growth Oil : फक्त एक महिना 'हे' खास तेल वापरा, भुवया आणि पापण्या होतील जाड! थांबलेली वाढ पुन्हा होईल..
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल