आहारतज्ज्ञ सोनिया नारंग यांनी एका मुलाखतीमध्ये कोरियन लोकांच्या स्कीनचं रहस्य उघड केलं आहे. त्यांनी सांगितलं, कोरियन लोकांच्या चमकदार आणि तरुण त्वचेचे रहस्य केवळ कोरियन सौंदर्य उत्पादनेच नाही तर त्यांचा आहार देखील आहे. ते जे खातात ते त्यांच्या त्वचेत दिसून येते. आज आम्ही तुम्हाला त्यांनी सांगितल्या पदार्थांची माहिती देत आहोत, जे तुमच्या त्वचेचा पोत सुधारण्यात मदत करतील.
advertisement
कोरियन स्किनसाठी महत्वाचे पदार्थ आणि सवयी..
हायड्रेशन : स्किन चांगली राहावी म्हणून तज्ज्ञ नेहमीच भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. कोरियन लोकांच्या स्कीनचंही हेच महत्त्वाचं सिक्रेट आहेत. ते केवळ पाणी पिट नाही तर भरपूर पाणीयुक्त फळं ते खातात. म्हणूनच तुम्हालाही अशी स्किन हवी असेल तर काकडी, टरबूज आणि इतर पाणीयुक्त पदार्थ आपल्या आहारात नाही सामील करा. कारण यामुळे शरीर आणि त्वचा दोन्ही आतून हायड्रेट राहते. त्वचा चांगली हायड्रेटेड असली की ती आपसूकच तेजस्वी आणि नितळदिसते.
आंबवलेले पदार्थ : कोरियन लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आपल्यापेक्षा खूपच वेगळ्या आहेत. कोरियन लोक त्यांच्या प्रत्येक जेवणात आंबवलेले पदार्थ मोठ्या प्रमाणावर खातात. आंबवलेले पदार्थ प्रोबायोटिक्स रिच असतात, यामुळे गट हेल्दी राहते आणि पोटाचे आरोग्य सुधारते. कोरियन लोकांच्या आहाराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे किमची. हा पदार्थ त्यांचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात समाविष्ट असतो. पॉट निरोगी असले की त्याचा चांगला परिणाम तुमच्या चेहऱ्यावर लगेच दिसतो.
मासे आणि टोफू खा : किम्ची व्यतिरिक्त कोरियन लोक मासे आणि टोफूही भरपूर खातात. यामुळे शरीराला ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि कोलेजन प्रदान मिळते, जे त्वचेची लवचिकता राखतात, वृद्धत्वाचे परिणाम कमी करतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतात. नेहमी लक्षात ठेवा, योग्य आणि संतुलित आहार कोणत्याही क्रीम किंवा सीरमपेक्षा नक्कीच प्रभावी असतो.
भरपूर भाज्या खा : तुम्ही कधी कोरियन पदार्थ पैले किंवा चाखले असतील तर तुम्हाला कळेल. ते लोक जास्त मसालेयुक्त पदार्थ खात नाहीत. तर सौम्य चवीचे पण भरपूर भाज्या असलेले पदार्थ खातात. कोरियन पाककृती भाज्यांनी समृद्ध असतात. कारण भाज्यांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक तत्वे असतात, शरीरातील जळजळ कमी करतात, निरोगी त्वचा राखतात आणि नैसर्गिकरित्या वृद्धत्वाचे परिणाम कमी करतात.
तुमच्या त्वचेवर या सगळ्या गोष्टींचे खूप सकारात्मक परिणाम होतील एक महिना या टिप्स फॉलो करून पाहा. जास्त पाणी प्या, आंबवलेले पदार्थ खा आणि भरपूर पाणी प्या. सोबतच पुरेशी झोप घ्या आणि शक्य झाल्यास साखर खाणं टाळा. यामुळे तुमची त्वचा आतून सुंदर होईल आणि हेच सौंदर्य बाहेरूनही तुमच्या त्वचेवर दिसेल. फक्त आंबलेले पदार्थ आणि कोणत्या भाज्यांची अॅलर्जी असल्यास ते खाताना काळजी घ्या.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
