नाशिकमधील राणेनगर परिसरात दत्तू शेळके यांनी झोंब्लास्टिक आयुर्वेदीक पाणीपुरी सुरू केली आहे. ही पाणीपुरी औषधी असल्याचा शेळके यांचा दावा आहे. 'प्रत्येक गल्लीबोळात पाणीपुरी मिळते. पण, आपण वेगळ्या टेस्टची आणि आयुर्वेदीक पाणीपुरी द्यायचं ठरवलं होतं. त्यासाठी मी खास रिसर्च केला. तुळस,अवळा,कडुनिंब, हारडा,हिंग, कळोजी,पिंपळी यासारख्या 42 वस्तूंता वार मी यामध्ये मी वापल्या आहेत. आमची ही हायजेनिक पाणीपुरी खाण्यासाठी अनेक जण दररोज हजेरी लावतात,' अशी प्रतिक्रिया शेळके यांनी दिली.
advertisement
केवळ एक महिना मिळतं पण अनेक फायदे देतं, एकदातरी खा 'हे' फळ
काय होतो फायदा?
तुळस : यामुळे शारीरिक कमजोरी दूर होते, सर्दी,खोकला जातो.आपल्या तोंडाचा येणारा दुर्गंध वास कमी होतो,तसेच कॅन्सरवर देखील तुळस उपायकारक आहे.
ओवा : कफ,पित्त, ओमेटिंग होत नाही तसेच वजन कमी करण्यास मदत होते.पचनशक्ती वाढते.
खजूर : हे शरीरासाठी चांगल असत,यामुळे कॅल्शियम वाढत,तसेच दाताना कीड लागत नाही हे फायदे आहेत.
पिपली : हे देखील शरीरासाठी चांगल असत,श्वास मोकळा होतो,खोकला बंद होतो,तसेच मलेरियावर देखील उपायकारक आहे.
पुण्यात चक्क सोन्या-चांदीचे मोदक? गणेशोत्सवात चितळेंच्या प्रयोगाची होतेय चर्चा
कुठे खाणार आयुर्वेदिक पाणीपुरी?
नाशिक शहरातील राणेनगर बोगद्या जवळील स्टेट बँक खाऊगल्ली परिसरात ही पाणीपुरी आहे,दत्तू शेळके हा पाणीपुरी स्टॉल चालवतात.