TRENDING:

Health tips : सकाळी उठल्यावर फक्त 'ही' पेयं प्या, वजन तर कमी होईल पण...

Last Updated:

आपल्यापैकी बहुतेक जण सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफीने दिवसाची सुरुवात करतात. रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी आपल्याला नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या पेयांइतका फायदा देत नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आपल्यापैकी बहुतेक जण सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफीने दिवसाची सुरुवात करतात. रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी आपल्याला नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या पेयांइतका फायदा देत नाही. त्यामुळे स्वत:ला निरोगी बनवायचं असेल तर चहा-कॉफीच्या सवयी बदला आणि दिवसाची सुरुवात हेल्दी ड्रिंक्सने करा, असा सल्ला तज्ज्ञ देतात. बरीच हेल्दी ड्रिंक वजन कमी करण्यात मदत करतात, असं म्हटलं जातं; पण ही ड्रिंक्स स्वतःहून वजन कमी करत नाही, त्यासाठी तुम्हाला संतुलित आहार व निरोगी लाइफस्टाइलची निवड करावी लागेल. आज आम्ही तुम्हाला अशा 7 ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत, जी तुम्हाला हेल्दी ठेवण्यास व वजन कमी करण्यास मदत करतील.
News18
News18
advertisement

कोमट लिंबू पाणी

एक ग्लास कोमट लिंबूपाणी मेटाबॉलिझम सुरू करू शकतं आणि पचनास मदत करू शकतं. कोमट लिंबूपाण्याने दिवस सुरू केल्याने शरीराला रात्रीच्या झोपेनंतर पुन्हा हायड्रेट करण्यात मदत होते. लिंबूपाणी हा साध्या पाण्याला एक चांगला रिफ्रेशिंग पर्याय असू शकतो. लिंबू हे व्हिटॅमिन सीचा एक उत्कृष्ट स्रोत आहे, जो रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखला जातो. व्हिटॅमिन सी एक अँटिऑक्सिडंट म्हणूनदेखील कार्य करतं. फ्री रॅडिकल्समुळे झालेल्या नुकसानापासून पेशींचं संरक्षण करण्यास लिंबूपाणी मदत करतं, या संदर्भात माहिती देणारं वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे.

advertisement

ब्लॅक कॉफी

ब्लॅक कॉफी हे लो कॅलरी ड्रिंक आहे जे अनेक प्रकारचे फायदे देतं. त्यात कॅफिन असतं, जे सतर्कता आणि एकाग्रता वाढवू शकतं. कॉफीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, जी पेशींचं नुकसान होण्यापासून वाचवण्यास मदत करतात. ब्लॅक कॉफीच्या नियमित सेवनाने काही रोगांचा धोका कमी होऊ शकतो, जसं की टाइप 2 मधुमेह, पार्किन्सन आणि काही प्रकारचे कॅन्सर. हे लिव्हरचं आरोग्य सुधारण्यास मदत करतं. मेटाबॉलिझम वाढवून आणि चरबी जाळण्यास प्रोत्साहन देऊन वजनाच्या व्यवस्थापनामध्ये योगदान देऊ शकतं; मात्र जास्त प्रमाणात ब्लॅक कॉफीचं सेवन केल्याने आरोग्यावर नकारात्मक दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे सेवन मर्यादित प्रमाणात करणं आवश्यक आहे.

advertisement

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे फ्री रॅडिकल्सशी लढतात. ते जुनाट आजारांचा धोका कमी करतात. त्यातील कॅटेचिन्स, विशेषतः EGCG मेटाबॉलिझम वाढवू शकतात, वजन व्यवस्थापनामध्ये मदत करतात. ग्रीन टीच्या नियमित सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होतो, मेंदूचं कार्य सुधारतं आणि अल्झायमर आणि पार्किन्सन्ससारख्या आजारांचा धोका कमी होतो. याव्यतिरिक्त, ग्रीन टी रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रित करण्यास, तोंडाचं आरोग्य निरोगी ठेवण्यास आणि वृद्धत्वाच्या लक्षणांशी लढा देऊन त्वचा निरोगी करण्यास मदत करू शकते.

advertisement

कोरफड ज्यूस

कोरफडीपासून बनवलेल्या ज्यूसचे संपूर्ण शरीरासाठी खूप फायदे आहेत. ते अ‍ॅसिड रिफ्लक्स आणि इरिटेबल बॉवेल सिंड्रोमसह पाचन अस्वस्थता दूर करू शकते. हा ज्यूस व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतो. यामुळे त्वचा चांगली राहते. जळजळ कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. कोरफड रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रित करण्यास, वजन व्यवस्थापन करण्यास आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करू शकतं; पण या ज्यूसचं सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे. कारण जास्त प्रमाणात सेवन केल्याने पाचन समस्या उद्भवू शकतात.

advertisement

दालचिनी चहा

दालचिनी चहा चवदार आणि सुगंधी ड्रिंक आहे. त्याचे खूप फायदे आहेत. त्यात अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. ते शरीरातला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि जळजळ यांचा सामना करण्यास मदत करू शकते. दालचिनी चहाचं सेवन रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतं. त्यामुळे डायबेटिस किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स असलेल्यांसाठी ते फायदेशीर ठरतं. काही अभ्यासानुसार, दालचिनी चहा कोलेस्टेरॉलची पातळी आणि रक्तदाब कमी करून हृदयाचं आरोग्य सुधारतो. याव्यतिरिक्त, दालचिनी चहातल्या वॉर्मिंग प्रॉपर्टीज पचनास मदत करतात आणि पचनाच्या अस्वस्थतेपासून आराम देतात.

हळद-काळी मिरी पाणी

हळद-काळी मिरीचें पाणी शरीरासाठी खूप उत्तम आहे. हळदीच्या अँटि इन्फ्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांना काळी मिरीच्या बायोअव्हेलेबिलिटीसह एकत्र करतं. हे ड्रिंक जळजळ कमी करण्यास, सांधेदुखी कमी करण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करू शकतं. हळदीमधलं अ‍ॅक्टिव्ह कंपाउंड कुर्क्युमिन, दीर्घकालीन रोगांशी लढण्यास, पचनास मदत करण्यासाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम आहे, असं एका अभ्यासातून समोर आलंय. काळी मिरीचा समावेश केल्याने कुर्क्युमिनचं अ‍ॅबसॉर्प्शन वाढतं. याव्यतिरिक्त, हळद व काळी मिरीचं पाणी मेटाबॉलिझम वाढवून वजन व्यवस्थापन करण्यास मदत करू शकतं. याचे अनेक फायदे असले तरी चांगल्या परिणामांसाठी संतुलित आहाराचा भाग म्हणून ते कमी प्रमाणात सेवन केलं पाहिजे.

चिया सीड्सचं पाणी

चिया सीड वॉटर हे चिया सीड्स पाण्यात भिजवून बनवलेलं एक पौष्टिक ड्रिंक आहे. ते जेलसारखं असतं. त्यामुळे हायड्रेशनसाठी मदत होते. कारण बिया पाणी शोषून घेतात आणि हळूहळू त्या पाणी सोडतात. चिया बियांमध्ये भरपूर फायबर, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे पचनास मदत करतात, जळजळ कमी करतात आणि हृदयाला निरोगी ठेवतात. याव्यतिरिक्त, चिया सीड्सचं पाणी रक्तातल्या साखरेची पातळी स्थिर करून वजन व्यवस्थापनास मदत करू शकतं.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health tips : सकाळी उठल्यावर फक्त 'ही' पेयं प्या, वजन तर कमी होईल पण...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल