महिलांना डायबिटीस झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे
यीस्ट संसर्ग
हा एक त्वचा रोग असून जेव्हा यीस्टच्या संसर्ग होतो तेव्हा रक्तातील साखर वाढते. अंगाला प्रचंड खाज येतो. अंगावर पांढरे ठिपके सुद्धा दिसून येतात. कधी कधी सतत खाज आल्यामुळे त्वचा लाल पडते. मुळातच पुरूषांपेक्षा हा संसर्ग महिलांना होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे जर महिलांना अचानक असा काही त्रास झाल्यास त्यांनी त्वचारोग तज्ज्ञांकडे जाऊन त्वरीत उपचार सुरू करावेत. मात्र त्याच बरोबर फिजिशिएनची भेट घेऊन डायबिटीसची तपासणी करून घ्यावी.
advertisement
पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोम (PCOS)
पीसीओएस हा आजकाल महिलांमध्ये सर्वात सामान्य आजारांपैकी एक आहे. हे डायबिटीसचंही लक्षण आहे. पी. सी. ओ. एस. ने ग्रस्त असलेल्या स्त्रियांमध्ये सामान्यतः इन्सुलिनचे संतुलन बिघडते, ज्यामुळे टाइप-2 डायबिटीस होऊ शकतो. सामान्य लक्षणांमध्ये अनियमित मासिक पाळी, जास्त वजन वाढणं अशा लक्षणांचा समावेश होतो.
युटीआय (UTI)
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, महिलांना यू. टी. आय. सारख्या संसर्गाचा अधिक धोका असतो. लघवीच्या वेळी जळजळ होणे, वारंवार लघवी होणे आणि मळमळ होणे ही लक्षणे आहेत.
गर्भधारणेदरम्यान (During Pregnancy)
काही स्त्रियांमध्ये गरोदरपणात मधुमेहाची लक्षणेही दिसून येतात. हार्मोनच्या असंतुलनामुळे इन्सुलिनच्या कार्यावरही परिणाम होतो. गरोदरपणातील मधुमेह असलेल्या महिलांना नंतरच्या आयुष्यात टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो.
हात-पायांना मुंग्या येणे, त्वचा काळी पडणे किंवा त्वचेवर (मानेभोवती किंवा बगलेत) डाग पडणे. अशी लक्षणे जर महिलांनामध्ये दिसून आली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.