TRENDING:

समुद्राच्या लाटा कशामुळे तयार होतात? त्या कुठून येतात? 99 टक्के लोकांना याबद्दल मोठा गैरसमज

Last Updated:

तुम्ही कधी विचार केला आहे का, की शांत दिसणाऱ्या या समुद्रात अचानक उंचच उंच लाटा कशा निर्माण होतात?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सुट्ट्या लागल्या किंवा एखादा विकेंड असला की आपल्याला सर्वात आधी आठवण येते ती म्हणजे विस्तीर्ण पसरलेल्या अथांग समुद्राची. पुढे येणारे फेसाळलेले पाणी, पायाखालची सरकणारी वाळू आणि कानावर पडणारा लाटांचा तो लयबद्ध आवाज... हे सर्व मन प्रसन्न करणारं असतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की शांत दिसणाऱ्या या समुद्रात अचानक उंचच उंच लाटा कशा निर्माण होतात?
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

कधीकधी या लाटा इतक्या शांत असतात की त्या आपल्या पायाला स्पर्श करून जातात, तर कधी चक्रीवादळात याच लाटा 'पाण्याच्या उंच भिंती' बनून समोर उभ्या ठाकतात. लाटांच्या निर्मितीमागे निसर्गाचं एक अजब विज्ञान दडलेलं आहे, ज्यामध्ये वारा, गुरुत्वाकर्षण आणि अगदी जमिनीखालील हालचालींचाही मोठा वाटा असतो. चला तर मग, या 'लाटांमागचं' गणित सोप्या भाषेत समजून घेऊया.

advertisement

1. वारा: लाटांचा खरा जन्मदाता

समुद्रातील बहुतेक लाटा वाऱ्यामुळे निर्माण होतात. जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागावरून वेगाने वारा वाहतो, तेव्हा वारा आणि पाणी यांच्यात घर्षण (Friction) निर्माण होतं. या घर्षणामुळे वाऱ्यातील ऊर्जा पाण्यात संक्रमित होते.

नियम साधा आहे: वारा जितका वेगवान, जितका जास्त वेळ वाहणारा आणि जितक्या मोठ्या क्षेत्रावर पसरलेला असेल, तितक्याच लाटा मोठ्या आणि शक्तिशाली असतात. समुद्रात येणारी वादळं अशा लाटा तयार करतात, ज्या किनाऱ्यावर पोहोचण्यापूर्वी हजारो किलोमीटरचा प्रवास करू शकतात.

advertisement

2. पाणी पुढे जातं की ऊर्जा? (भलतीच रंजक गोष्ट)

आपल्याला लाटा पुढे सरकताना दिसतात, पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की पाणी स्वतः पुढे जात नाही प्रत्यक्षात जी गोष्ट प्रवास करते ती असते 'ऊर्जा'. हे समजून घेण्यासाठी स्टेडियममधील 'मॅक्सिकन वेव्ह'चं उदाहरण सगळ्यात बेस्ट आहे. लोक आपल्याच जागेवर उभे राहतात आणि खाली बसतात, तरीही एक लाटा त्या मैदानात तयार झाली आहे असा आभास होतो. तसंच समुद्रात पाण्याचे कण एका गोलाकार मार्गाने वर-खाली फिरतात आणि पुन्हा आपल्या जागेवर येतात, मात्र त्यातून निर्माण झालेली ऊर्जा किनाऱ्याकडे धावते.

advertisement

3. गुरुत्वाकर्षणाची जादू

लाटांच्या हालचालीत पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा मोठा वाटा असतो. वाऱ्याने पाण्याला वर उचलल्यानंतर, गुरुत्वाकर्षण त्याला पुन्हा खाली खेचतं. वारा आणि गुरुत्वाकर्षण यांच्यातील या 'ओढाताणी'मुळेच लाटांना तो विशिष्ट वळणदार आकार प्राप्त होतो.

4. चंद्र आणि सूर्याचा प्रभाव: भरती-ओहोटी

काही लाटा वाऱ्यामुळे नाही, तर आकाशातील ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे येतात, ज्याला आपण 'भरती-ओहोटी' (Tides) म्हणतो. यामध्ये चंद्राचा प्रभाव सर्वाधिक असतो. चंद्र पृथ्वीवरील महासागरांना आपल्याकडे खेचतो, ज्यामुळे समुद्राची पातळी वाढते. पौर्णिमा आणि अमावस्येला जेव्हा सूर्य आणि चंद्र एकाच रेषेत येतात, तेव्हा हे गुरुत्वाकर्षण अधिक शक्तिशाली होतं आणि समुद्रात मोठी भरती येते.

advertisement

5. 'सुनामी' नक्की कशी येते?

सर्वच लाटा वाऱ्यामुळे येत नाहीत. सर्वात भयानक आणि विनाशकारी लाटा, ज्याला आपण 'सुनामी' म्हणतो, त्या समुद्राच्या तळाशी होणाऱ्या हालचालींमुळे निर्माण होतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षणाची जोड अन् जिद्दीची भरारी,माय-लेकाने सुरु केला व्यवसाय, कमाई तर पाहा
सर्व पहा

समुद्राखाली होणारे भूकंप (Earthquakes), ज्वालामुखीचा उद्रेक किंवा भूस्खलन (Landslides) यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी विस्थापित होतं. यातून निर्माण झालेल्या लाटा विमानासारख्या वेगाने समुद्रात धावू लागतात आणि जेव्हा त्या उथळ किनाऱ्याजवळ येतात, तेव्हा त्यांची उंची एखाद्या डोंगराएवढी होते. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही समुद्राच्या लाटा पाहाल, तेव्हा लक्षात ठेवा की त्यामागे निसर्गाची किती मोठी शक्ती काम करत आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
समुद्राच्या लाटा कशामुळे तयार होतात? त्या कुठून येतात? 99 टक्के लोकांना याबद्दल मोठा गैरसमज
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल