पण आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची साबुदाणा खिचडी यापुढे कधीच चिकट होणार नाही आणि जशी तुम्ही बाहेर दुकानात खाता तशी सुडसुडीत बनेल.
चांगली खिचडी म्हणजे चांगली निवड
बाजारात छोटे, मोठे आणि नायलॉन टाईप साबुदाणे मिळतात. पण मध्यम आकाराचा गोल साबुदाणा ही खिचडीसाठी सर्वोत्तम निवड आहे.
advertisement
साबुदाणा भिजवण्याची योग्य पद्धत:
1 कप साबुदाणा 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवा, जेणेकरून त्यातील अतिरिक्त स्टार्च निघून जाईल.
त्याच ज्या कपाने साबुदाणा घेतला त्याच कपात ¾ पाणी वापरून साबुदाणा भिजवा. लक्षात ठेवा पाणी नेहमी साबुदाण्याच्या तुलनेत कमीच असावं.
झाकण ठेवून 2.5 तासासाठी झाकून ठेवा. मध्ये एकदा तपासा जर दाणे अजून घट्ट वाटत असतील, तर थोडे पाणी शिंपडा.
परफेक्ट भिजलेला साबुदाणा कसा ओळखायचा?
-दाणे एकमेकांना चिकटलेले नसावेत.
-हाताने दाबल्यावर सहज तुटावा.
-त्यात ओलावा असला तरी देखील तो हाताला कोरडा वाटावा.
साहित्य:
भिजवलेला साबुदाणा – 1 कप
बटाटे – 2 मध्यम (साधे चिरलेले)
भाजलेले शेंगदाणे – 4 टेबलस्पून
शेंगदाणा पूड – 2 टेबलस्पून
जीरे – 1 टीस्पून
किसलेले आले – अर्धा इंच
हिरव्या मिरच्या – 2 (बारीक चिरलेल्या)
सैंधव मीठ – चवीनुसार
लिंबाचा रस – 1 टीस्पून
तूप – 1 टेबलस्पून
कोथिंबीर – सजावटीसाठी
खिचडी बनवण्याची पद्धत:
कढईत तूप गरम करून त्यात जीरे, आले आणि मिरच्या परतवा. नंतर बटाटे टाका आणि शिजेपर्यंत परता. त्यात भाजलेले शेंगदाणे घाला.
त्यात भिजवलेला साबुदाणा टाका. त्यासोबत मीठ घालून मंद आचेवर परतवा. आता शेंगदाण्याची पूड घालून व्यवस्थित मिसळा. ही पूड ओलावा शोषून घेते आणि खिचडी सैलसर होते.
शेवटी लिंबाचा रस आणि कोथिंबीर घाला. झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ येऊ द्या.
ही खमंग आणि सडसडीत खिचडी तुम्ही दह्यासोबत, उपवासासाठी खास चटणीसोबत सर्व्ह करू शकता.
(टीप: ही रेसिपी उपवासासाठी योग्य असून, सध्याच्या श्रावण महिन्यात तर अगदी परफेक्ट आहे.)