असं म्हणतात साखर ही डायबिटीसच्या रूग्णांची शत्रू आहे. त्यामुळे साखर, साखरेचे पदार्थ, कोल्डड्रिंक्स आणि गोड पदार्थ खाणं टाळावं.
नियमित व्यायाम केल्याने फॅटी लिव्हरचा धोका कमी होतो आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण राहते. त्यामुळे रोज अर्धा तास चालणं, सायकलिंग, किंवा योगा केलात तर फॅटी लिव्हरचा त्रास कमी होऊ शकेल.
advertisement
मद्यपानाचा यकृताच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि लिव्हर सिरोसिसचा धोका वाढवते. धूम्रपान यकृताच्या पेशींवर ताण आणून इन्फ्लमेशन वाढवतं. त्यामुळे फॅटी लिव्हर असणाऱ्यांनी मद्यपान आणि धूम्रपान टाळावं.
काही औषधे यकृतासाठी हानिकारक असू शकतात.त्यामुळे कोणतीही औषधं घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, औषधांच्या नियमिततेमुळे रक्तातील साखरेचे योग्य नियंत्रण होते. त्यामुळे तुम्ही डायबिटीसच्या गोळ्या, इंजेक्शन वेळेवर घेणं तुमच्या आणि तुमच्या यकृताच्या आरोग्यासाठी फायद्याचं आहे.
जास्त वजन किंवा स्थूलता (Obesity) फॅटी लिव्हर आणि इन्सुलिन कमी होण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे तुम्ही वजन नियंत्रणात ठेवलं तर तुमच्या यकृताची कार्यक्षमता सुधारेल.
मानसिक ताण हे सुद्धा डायबिटीसचं एक मुख्य कारण आहे. जशी साखर आरोग्यासाठी धोक्याची आहे तसाच ताण हा सुद्धा धोक्याचा आहे. सततच्या ताणामुळे डायबिटीस वाढून यकृत आणि शरीराच्या आरोग्यावर वाईट एकूणच परिणाम होतो.