TRENDING:

Benefits of Vegetable Peels: अरेरे! तुम्ही फळं आणि भाज्यांच्या साली फेकून देता ? आजच थांबवा नाहीतर मिळणार नाहीत ‘हे’ फायदे

Last Updated:

Benefits of Peels: फळं आणि भाज्या आपल्या निरोगी आयुष्याचा आणि पौष्टिक आहाराचा अविभाज्य भाग आहेत. भाज्यांची देठं जशी फायद्याची असतात तसंच फळांच्या, कंदमुळांच्या सालींचे अनेक फायदे आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : फळं आणि भाज्या आपल्या निरोगी आयुष्याचा आणि पौष्टिक आहाराचा अविभाज्य भाग आहेत. ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढून आपलं विविध आजारांपासून रक्षण होऊ शकतं. भाज्या तर आपण निवडून, कापून, शिजवून खातो. भाज्यांची देठं जशी फायद्याची असतात तसंच फळांच्या, कंदमुळांच्या सालींचे हे अनेक फायदे आहेत.
प्रतिकात्मक फोटो : या’ कारणांसाठी महत्त्वाच्या आहेत फळं आणि भाज्यांच्या साली
प्रतिकात्मक फोटो : या’ कारणांसाठी महत्त्वाच्या आहेत फळं आणि भाज्यांच्या साली
advertisement

जाणून घेऊयात सालींचे फायदे

आपल्या जेवणात कांदा बटाट्यांचा सर्रासपणे वापर होत असतो. सोसल्यानंतर कांदे- बटाट्यांची सालं आपण आपण डस्टबिनमध्ये टाकून देतो. पण या सालीचा वापर आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

जाणून घेऊयात काही फळं, कंदमुळांच्या सालीचे फायदे

advertisement

कांद्याच्या सालीचे फायदे (Onion Peel Benefits)

कांद्यांच्या सालींचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. कांद्याच्या सालींमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायटोन्यूट्रिएंट्स, आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात. कांद्याच्या सालींमध्ये क्वेरसेटिन नावाचा अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतो.हे अँटीऑक्सिडंट हृदयासाठी फायदेशीर आहे आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवते. कांद्याच्या सालींमध्ये सूक्ष्म पोषक घटक असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

advertisement

बटाट्याच्या सालीचे फायदे (Potato Peel Benefits)

बटाटे हा भारतीयांच्या जेवणातला एक अविभाज्य भाग आहे.मग ती व्यक्ती महाराष्ट्रातली असो वा पंजाबमधली. सर्वसाधारपणे आपण बटाटे सोलल्यानंतर त्याची सालं फेकून देतो. पण बटाटाच्या सालीमध्ये असलेले व्हिटॅमिन आणि एंझाइम्ससमृद्ध डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. सुजलेल्या आणि थकलेल्या डोळ्यांना आराम देण्यासाठी बटाट्यांच्या सालींचा वापर होता. बटाटा कापून झाल्यानंतर त्या साली 10 मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवल्यांनी डोळ्यांना आराम तर मिळतोच मात्र डोळ्यांखालची काळी वर्तुळं कमी व्हायला मदत होते. याशिवाय बटाट्याच्या सालींमध्ये व्हिटॅमिन C आणि B6 असते, जे प्रतिकारशक्ती वाढवतात.बटाट्याच्या सालींमधील फायबर रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.

advertisement

हे सुद्धा वाचा : लिंबाच्या सालीचे आहेत 'इतके' फायदे

सफरचंदाची साल (Apple Peel Benefits)

सफरचंद दीर्घकाळ टिकण्यासाठी आणि रंगीत दिसण्यासाठी त्यावर मेण लावलं जातं. त्यामुळे अनेक जण सफरचंदसुद्धा सोलून खायला लागले आहेत. सफरचंदाच्या सालीमध्ये व्हिटॅमिन ई असतं जे त्वचा मऊ आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. याशिवाय सफरचंदाच्या सालीमध्ये असलेलं कोलेजन त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे मुरुम-पिंपल्सची समस्याही दूर होऊ शकते.

advertisement

केळ्याची साल (Banana Peel Benefits)

दात चमकदार करण्यासाठी केळ्याची साल खूप फायद्याची आहे. केळ्याच्या सालींमध्ये मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि पोटॅशियम असते, जे दातांच्या इनेमलसाठी फायद्याचे असतात. केळ्याच्या सालीचा आतला भाग दातांवर चोळल्यामुळे दातांचा पिवळसरपणा दूर व्हायला मदत होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
फक्त 1000 रुपयांमध्ये रेल्वे स्थानकावर सुरू करा व्यवसाय,असा घ्या खास योजनेचा लाभ
सर्व पहा

हे सुद्धा वाचा : आरोग्यासाठी गुणकारी आहे लसणाची साल, कचऱ्यात फेकून देण्याआधी वाचा ‘हे’ फायदे

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Benefits of Vegetable Peels: अरेरे! तुम्ही फळं आणि भाज्यांच्या साली फेकून देता ? आजच थांबवा नाहीतर मिळणार नाहीत ‘हे’ फायदे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल