आरोग्यासाठी गुणकारी आहे लसणाची साल, कचऱ्यात फेकून देण्याआधी वाचा ‘हे’ फायदे
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
- Published by:News18 Marathi
Last Updated:
लसूण या कांद्याच्या परिवारातील कंदमुळाच्या सालीचे देखील शरीरासाठी अनेक गुणकारी उपयोग आहेत. याबद्दलच आयुर्वेद तज्ज्ञ असलेल्या कोल्हापुरातील डॉक्टर अनिल कुमार वैद्य यांनी माहिती दिली आहे.
फळभाज्यांमधील बऱ्याचशा भाज्यांची साल ही काढून टाकली जाते. मात्र प्रत्येक सालीमध्ये असणारे बरेचसे गुणधर्म हे शरीरासाठी उत्तमच असतात अशाच प्रकारे लसूण या कांद्याच्या परिवारातील कंदमुळाच्या सालीचे देखील शरीरासाठी अनेक गुणकारी उपयोग आहेत. मात्र हे फायदे कित्येकांना ठाऊकच नसतात. त्यामुळे आयुर्वेद तज्ज्ञ असलेल्या <a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/">कोल्हापुरातील</a> डॉक्टर अनिल कुमार वैद्य यांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
विशेषतः जर घशासंदर्भात समस्या जाणवत असतील. घसा दुखत असेल, ताप येण्याची लक्षणे वाटत असतील, तर अशावेळी लसणाची साल वापरून केलेल्या काढ्याने गुळण्या केल्यास नक्कीच आराम भेटतो. लसणीच्या सालीमध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्याची मदत होतो. लसणाच्या सालीचा चहा हा यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. असा चहा दररोज घेणे उत्तम ठरते.
advertisement
advertisement











