केळ्याप्रमाणे केळ्याच्या सालीत फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात, जे पचन सुधारण्यास मदत करतात आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. केळ्याच्या सालीचा रस बनवून प्यायल्यास चांगले परिणाम दिसून येतात.
advertisement
केळ्याच्या सालीत सालीतील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. सालीतले पॉलीफेनॉल्स आणि फ्लॅवोनॉइड्स सांधेदुखी, वेदना कमी करण्यात मदत करतात. लहान जखमांवर किंवा किड्यांच्या चावण्यावर केळ्याची साल लावल्याने आराम मिळतो.
केळीच्या सालीत लुटीन (lutein) नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि मोतीबिंदूसारख्या समस्यांपासून बचाव करते.
केळीच्या सालीत अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करतात. केळीची साल मुरुमांवर चोळल्याने मुरूमांचा त्रास कमी होतो. केळीच्या सालीतील एन्झाइम्स त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात
केळीच्या सालीत पोटॅशियम व मॅग्नेशियम असते, ज्यामुळे दात पांढरे व चमकदार होतात. केळ्याची साल दातांवर हळुवारपणे चोळल्यास चांगले परिणाम दिसून येतात
केळ्याच्या सालीत नैसर्गिक तेल असते, जे केसांना पोषण देऊन त्यांना मऊ आणि चमकदार बनवते.
केळ्याच्या सालीची पेस्ट करून तिचा मास्क म्हणून वापर करता येतो. यामुळे त्वचेचा रंग उजळून त्वचा कोमल आणि मुलायम व्हायला मदत होते.
केळ्याची साल कुजवून तिचा सेंद्रीय खत म्हणून वापर करता येतो, जे झाडांसाठी फायदेशीर ठरतं.