TRENDING:

Online Game Addiction : ऑनलाइन गेमचा जीवघेणा विळखा! मुलांमध्ये होणाऱ्या 'या' बदलांकडे अजिबात करून नका दुर्लक्ष..

Last Updated:

Online game addiction signs and side effects on kids : गाजियाबादमधील तीन मुलींनी केलेल्या आत्महत्येमुळे देश हादरला आहे. ऑनलाइन गेमिंग केवळ छंदापुरती न राहता आता ती जीवघेण्या टप्प्यावर पोहोचत असल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : डिजिटल मनोरंजनाकडे लोकांचा कल वाढत असताना गाजियाबादमधील तीन मुलींनी केलेल्या आत्महत्येमुळे देश हादरला आहे. या घटनेनंतर मुलांच्या मानसिक आरोग्याबाबतही गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. ऑनलाइन गेमिंग केवळ छंदापुरती न राहता आता ती जीवघेण्या टप्प्यावर पोहोचत असल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे. उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील या घटनेने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं असून पालकांसाठी हा एक धोक्याचा इशारा आहे.
ऑनलाइन गेमिंग अ‍ॅडिक्शनचे संकेत..
ऑनलाइन गेमिंग अ‍ॅडिक्शनचे संकेत..
advertisement

गाजियाबादमधील साहिबाबाद परिसरातील भारत सिटी सोसायटीत राहणाऱ्या तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तिन्ही बहिणींचे वय अनुक्रमे 12, 14 आणि 16 वर्षे होते. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, त्या एका टास्क-बेस्ड ऑनलाइन कोरियन लव गेमच्या आहारी गेल्या होत्या. याच गेमपायी त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

advertisement

नेमकं काय घडलं होतं 3 मुलींच्या बाबतीत?

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही बहिणी दीर्घकाळापासून मोबाईल गेमिंगमध्ये गुंतलेल्या होत्या. त्यांनी शाळेत जाणं बंद केलं होतं आणि त्यांचा बाहेरील सामाजिक संपर्कही तुटला होता. कोरियन संस्कृतीचा प्रभाव त्यांच्यावर इतका वाढला होता की त्यांनी स्वतःची कोरियन नावंही ठेवली होती. वडिलांनी मोबाईल गेमिंगवर आक्षेप घेत मोबाईल काढून घेतल्यानंतर त्या तीव्र मानसिक तणावाखाली गेल्या. यानंतर त्यांनी इमारतीच्या 9 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. घटनास्थळी सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये 'मम्मी-पापा सॉरी… आम्ही गेम सोडू शकत नाही' असे नमूद करण्यात आले होते. या घटनेमुळे डिजिटल युगात राहणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.

advertisement

तज्ज्ञांच्या मते, कोरियन लव गेम हा सोशल मीडियाच्या माध्यमातून चालणारा एक धोकादायक ऑनलाइन प्रकार आहे. यात अनोळखी व्यक्ती स्वतःला कोरियन असल्याचं सांगून युजरशी संवाद साधते. विश्वास संपादन केल्यानंतर छोटे-छोटे टास्क दिले जातात. सुरुवातीला हे टास्क सोपे असतात, मात्र हळूहळू ते कठीण आणि मानसिक दबाव वाढवणारे बनतात. टास्क पूर्ण न केल्यास धमकी किंवा भीती दाखवली जाते. अशा गेममध्ये सुमारे 50 टास्क असतात आणि ते पूर्ण करण्यासाठी अनेकदा अनेक दिवस लागतात.

advertisement

मानसिक आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात?

मानसिक आरोग्य तज्ज्ञांनुसार, लहान मुले आणि किशोरवयीन मुलांचा मेंदू पूर्णपणे विकसित झालेला नसतो. त्यामुळे ते गेममधील पात्रं आणि आव्हानांना वास्तव समजू लागतात. त्यातील टास्कमुळे सततचा दबाव, अपयशाची भीती आणि टास्क पूर्ण करण्याची सक्ती यामुळे त्यांची निर्णयक्षमता कमी होत जाते. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ जीन एम. ट्वेंग यांच्या iGen या पुस्तकानुसार 2011 नंतर ऑनलाइन गेमिंग आणि सोशल मीडिया अ‍ॅडिक्शनमुळे तरुणांमध्ये नैराश्य आणि आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

advertisement

ऑनलाइन गेमिंग अ‍ॅडिक्शनचे संकेत

पालकांनी काही ठराविक संकेतांकडे दुर्लक्ष करू नये असे तज्ज्ञ सांगतात. मुलं सतत मोबाईल किंवा गेममध्ये गुंतलेली असणं, गेम बंद केल्यावर चिडचिड किंवा राग व्यक्त करणं, कुटुंबीयांपासून दूर राहणं, झोपेची वेळ आणि दैनंदिन सवयी बिघडणं, अभ्यासात रस कमी होणं, सतत उदास, घाबरलेली किंवा रिकामेपणाची भावना व्यक्त करणं हे ऑनलाइन गेमिंग अ‍ॅडिक्शनचे संकेत असू शकतात. असे 4 ते 5 लक्षणे सातत्याने दिसत असतील, तर पालिकांनी तात्काळ सतर्क होणं आवश्यक आहे.

पालकांसाठी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

तज्ज्ञांच्या मते, मुलांना मोबाईल देणं चुकीचं नाही, मात्र योग्य नियंत्रण आणि संवाद अत्यावश्यक आहे. पालकांनी मुलांशी मोकळेपणाने संवाद साधावा, स्क्रीन टाइमवर लक्ष ठेवावं आणि स्मार्टफोनमध्ये पेरेंटल कंट्रोलचा वापर करावा. पेरेंटल कंट्रोलद्वारे गेम्स, अ‍ॅप्स आणि ऑनलाइन कंटेंटवर मर्यादा घालता येतात. यामुळे मुलांना धोकादायक गेम्स आणि मानसिक नुकसान करणाऱ्या चॅलेंजपासून दूर ठेवता येऊ शकतं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तूर आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Online Game Addiction : ऑनलाइन गेमचा जीवघेणा विळखा! मुलांमध्ये होणाऱ्या 'या' बदलांकडे अजिबात करून नका दुर्लक्ष..
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल