पश्चिम चम्पारण, 7 ऑक्टोबर : भारतामध्ये अनेक ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहेत. यामध्ये बिहार राज्यातील वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प हा आपल्या सौंदर्य आणि रहस्यासाठी प्रसिद्ध आहे. हा संपूर्ण परिसर हिमालयाच्या पायथ्याशी वसलेला आहे. याठिकाणी विविध प्रकारच्या जमाती राहतात. या जमातींमध्ये थारू जमातीचे लोक मोठ्या प्रमाणात आहेत.
विशेष म्हणजे, जंगलातील या आदिवासी लोकांची खाद्यसंस्कृती इतकी वेगळी आहे की, ज्याची कुणीही कल्पनाही करू शकत नाही. मांसाहार तर दूरच पण याठिकाणी तयार केल्या जाणाऱ्या भाज्याही सामान्य भाज्यांपेक्षा वेगळ्या असतात. यातच एक भाजी म्हणे बांबूची भाजी. या भाजीला अत्यंत आनंदाने इथे खाल्ले जाते. तुम्हाला ऐकून खोटं वाटेल, पण हे खरंय. याचा वापर आपण घर, मचान, ट्रॅक इत्यादी बनवण्यासाठी करतो. मात्र, थरूहटमध्ये त्याला भाजी म्हणून खूप आवडीने खाल्ले जाते.
advertisement
जंगलातील थरुहटमध्ये बनवली जाते ही भाजी -
पश्चिम चम्पारण जिल्ह्याच्या गौनाहां परिसर हा आदिवास भाग आहे. याठिकाणी गौनाहां व्यतिरिक्त जिल्ह्यातील हरनाटांड़, बगहा आणि मैनाटांडमध्येही थारू जमातीचे लोक राहतात. पण त्यांच्याशी संबंधित ज्या विशेष गोष्टी जंगलात आढळतात, त्या इतर कुठेही पाहायला मिळत नाही.
गौनाहाच्या डोमाठ गावातील रामकिशन हे एक आदिवासी थारू आहेत. त्यांच्या इथे बांबूच्या भाजीला मोठ्या आनंदाने बनवली जाते आणि खाल्ली जाते. रामकिशन यांच्या सून जयंत्री देवी यांनी सांगितले की, बांबूची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधीची बांबू वनस्पती (कोपल) वापरली जाते. थरुहटमध्ये बांबूला तवा आणि लहान रोपाला पोपडा म्हणतात.
जयंत्री देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजीसाठी पोपडा आधी सोलून त्याला तीन दिवस पाण्यात भिजवले जाते. फर्मेंटेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पोपडा पूर्णपणे आंबट होतो. याच आंबट पोपड्यापासून भाजी बनवली जाते. ज्याप्रकारे बिहारमध्ये आलू भुजिया बनवले जाते, त्याचप्रकारे थरुहटमध्ये पोपडेची भाजी बनवली जाते. विशेष म्हणजे ते तळणे, ग्रेव्ही आणि करी या स्वरूपातही तयार केले जाते आणि खाल्ले जाते.
या भाजीला बनवण्याची प्रक्रिया इतर भाज्यांच्या तुलनेत वेगळी आहे. गरम तेलात पोपडे टाकून त्यामध्ये हिरवी मिरची टाकतात. थोड्या वेळ फ्राय केल्यानंतर त्यात लसूण आणि सरसोची पेस्ट टाकली जाते. यानंतर त्यात मीठ, मिरची पावडर, काही गरम मसाले आणि हळदी टाकून तयार केली जाते. रंग लाल झाल्यावर त्यात पाणी घालून मंद आचेवर 10 मिनिटे शिजवून खाल्ले जाते.