हळदीचं दूध प्या
तुम्हाला धूळ आणि मातीच्या अॅलर्जीमुळे त्रास होत असेल आणि ऐन दिवाळीत तुम्हाला अॅलर्जीमुळे खोकला, सर्दी, नाकात खाज येणं किंवा प्रदूषणाचा त्रास होत असेल, तर हळदीचं दूध तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतं. त्यामुळे सीझनल आजारांपासूनही बचाव होतो. यासाठी एका ग्लास गरम दुधात फक्त एक चमचा हळद मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी प्या. हळदीत असलेल्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे अॅलर्जी लवकर दूर होईल. थंडी आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या त्रासापासूनही दिलासा मिळेल.
advertisement
मध
आयुर्वेदात मधाला खूप महत्त्व आहे. त्यात असलेले औषधी गुणधर्म आपल्या अनेक समस्या दूर करतात. सर्दीपासून आराम मिळण्यासाठी आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठीही मध फायदेशीर ठरतो. धुळीच्या अॅलर्जीपासून आराम मिळवण्यासाठीदेखील मध उपयुक्त आहे. यासाठी कोमट पाण्यात 1-2 चमचे मध मिसळून दिवसातून 2-3 वेळा प्या. मधामध्ये आढळणारे नैसर्गिक घटक अॅलर्जीपासून बचावाचं काम करतात.
गायीचं तूप
गाईच्या दुधाचं तूप अत्यंत शुद्ध असून आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतं. तुपाचं सेवन केल्याने आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. गाईच्या तुपाचा योग्य वापर केल्यास प्रदूषण आणि धुळीच्या अॅलर्जीपासून आराम मिळू शकतो. तुम्हालाही दिवाळीत धुळीच्या अॅलर्जीचा त्रास होत असेल तर रोज सकाळी देशी गायीचं तूप थोडं गरम करून नाकात त्याचे दोन थेंब टाकावेत. असं केल्याने तुमची अॅलर्जीच्या समस्येपासून सुटका होईल. लवकरच सर्दी बरी होईल आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढेल.
