सिकर, 13 नोव्हेंबर : सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह आहे. यानिमित्ताने घरोघरी गोडाधोडाचे पदार्थ असतात. दुकानांमध्येही विविध प्रकारच्या स्वादिष्ट मिठाई पाहायला मिळतात. यापैकी काही मिठाई तेलात बनवलेल्या असतात, तर काही साजूक तुपात. आजकाल मिठाईच नाही, तर जवळपास सर्वच पदार्थांमध्ये भेसळ आढळते. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत खाद्य विभागाकडून योग्य ती तपासणी केली जाते. आज आपण मिठाईसाठी वापरल्या जाणारा मोहरीच्या तेलात भेसळ असेल, तर ती कशी ओळखायची हे पाहणार आहोत.
advertisement
मोहरीच्या तेलातील भेसळ ओळखण्यासाठी कोणत्याही प्रयोगशाळेत जायची गरज नाही, तर आपण घरच्या घरी अवघ्या 5 मिनिटांतदेखील ही भेसळ ओळखू शकता. मोहरीच्या तेलाला एक विशिष्ट वास असतो. त्याचा रंगही गडद असतो. खरंतर हीच शुद्ध मोहरीच्या तेलाची ओळख आहे. परंतु बाजारात असेही काही पदार्थ मिळतात ज्यांचा समावेश केल्यास मोहरीच्या तेलाला शुद्ध वास आणि शुद्ध रंग येतो.
दिवाळीतील फराळामुळे वजन वाढू नये म्हणून आहार कसा असावा? आहार तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
तेल व्यापारी कुलदीप बाजिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहरीच्या तेलाची पातळी वाढवण्यासाठी त्यात पाम तेलाचा समावेश सर्रास केला जातो. पाम तेल तुपासारखंच असतं. मात्र त्याची किंमत मोहरीच्या तेलापेक्षा फार कमी असते. म्हणूनच भेसळ करणाऱ्यांना ते सहज परवडतं. शिवाय पाम तेल मोहरीच्या तेलात मिसळून अगदी एकजीव होतं. त्यामुळे दोघांमधला फरक ओळखणं कठीण असतं, परंतु अशक्य नाही.
रोज तोच तोच नाश्ता करून कंटाळा आलाय? मग यापद्धतीनं बनवा पोह्यांचा डोसा
मोहरीचं तेल 5 मिनिटं फ्रिझरमध्ये ठेवावं. तेलाचं पातेलं बाहेर काढून पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की, पाम तेल खाली गोठलं गेलंय आणि वर केवळ मोहरीचं तेल उरलंय. अशी स्थिती पाहायला मिळाली की, समजून जावं आपल्या तेलात भेसळ आहे.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
