बाराबंकी, 29 सप्टेंबर : भारतामध्ये अनेक ठिकाणी सुप्रसिद्ध आणि अतिशय चविष्ट असे खाद्यपदार्थ मिळतात. यातील एक खाद्यपदार्थ म्हणजे जो सर्वांना आवडतो, तो म्हणजे समोसा. समोसा सर्वांना आवडतो. एक ठिकाण असे आहे, ज्याठिकाणी अत्यंत चविष्ट असा समोसा मिळतो. ते ठिकाण नेमकं कोणतं, किती वर्षांची ही परंपरा आहे, याबाबत जाणून घेऊयात.
याठिकाणी अनेक वर्षांपासून समोसा बनवला जात आहे. हा समोसा इतका चवदार असतो की, यासाठी प्रत्येक दिवशी शेकडो लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. याठिकाणी लोक हा समोसा खाण्यासाठी बराच वेळ प्रतिक्षाही करतात. हे ठिकाण उत्तरप्रदेशातील बाराबंकी शहराच्या धनोखर चौकात आहे. शुभारंभ स्वीट या नावाने हे दुकान दूरदूरपर्यंत ओळखले जाते.
advertisement
दुकानाला किती वर्षे झाली -
याठिकाणी समोसाप्रेमी दूरदूरवरुन समोसा खायला येतात. याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. शहारातील बब्बी गुप्ता यांनी 5 वर्षांपूर्वी समोसा बनवण्याचे काम सुरू केले. त्यांची समोसा बनवण्याची पद्धत आणि त्याची चव यामुळे प्रत्येकाला हा समोसा आवडत आहे. हळूहळू यांचा समोरा जिल्ह्यात खूपच प्रसिद्ध झाला.
समोसामध्ये जो बटाटा आम्ही वापरतो, त्यात आम्ही ओरिजिनल मसाल्याचा वापर करतो. तसेच जे तेल वापरले जाते, तेसुद्धा उत्कृष्ट दर्जाचे असते. यामुळे समोसामुळे कुणाला त्रास होत नाही. यासाठी लोक आमच्या समोसाला जास्त पसंद करतात.
दुकानावर लागलेली असते लाईन -
ग्राहकाने सांगितलं की, हा समोसा प्रत्येक दिवशी ते याठिकाणी येतात. येथील समोसा हा खूपच चवदार असतो. तसेच आकारानेही मोठा असतो. यामधील बटाटा आणि त्यात वापरला जाणारा मसाला, यामुळे हा समोसा खूपच चविष्ट लागतो. यासाठी आम्ही लोक याठिकाणी खायला येतात आणि पॅकही करुन घेऊन जातो. विशेष म्हणजे समोसाचा दर अगदीच कमी आहे. याठिकाणी फक्त 10 रुपयाला हा मोठ्या आकाराचा आणि अत्यंत चविष्ट असा समोसा मिळतो. तुम्हालाही संधी मिळाली, तर तुम्हीही एकदा या समोसाचा स्वाद नक्की घ्या.