गाझियाबाद, 29 सप्टेंबर : प्रचंड उकाडा जाणवला की, अनेक जण मग शीतपेयांची दुकाने शोधतात. उन्हाळ्यात लस्सी, ज्यूस यांना खूप मागणी असते. यात आता दिल्ली-एनसीआरच्या अनेक परिसरात भीषण उकाडा जाणवत आहे. गाझियाबादच्या जुन्या बस स्थानकावर लालमन लस्सी खूप प्रसिद्ध आणि जुने दुकान आहे. भीषण उकाडा जाणवत असताना येथील लस्सी तुम्हाला नक्कीच आनंद देईल. त्यामुळे याठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते.
advertisement
गाझियाबादमध्ये आता सप्टेंबर महिन्यातही प्रचंड उकाडा जाणवत आहे. त्यामुळे याठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते. दुकानाचे मालक लालमन सिंह यांनी सांगितले की, उकाडा वाढला तर ती आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. कारण 4 महिन्याचा सीजन असतो. मात्र, आता उकाडा असल्याने लोकांची याठिकाणी गर्दी होत असल्याचे आमचा व्यवसाय चांगला सुरू आहे. प्रचंड उकाडा जाणवत असल्याने याठिकाणी आता लस्सी पिण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे, असे त्यांनी सांगितले.
रात्री किती वाजेपर्यंत विक्री -
लालमन यांनी सांगितले की, लस्सी विकताना कर्जांचा डोंगर डोक्यावर झाला होता, अशी परिस्थितीही पाहिली. मात्र, आता अशी परिस्थिती नाही. चार मुले या दुकानावर काम करतात. सकाळी 8 पासून ते रात्री 10 पर्यंत आम्ही लोकांना लस्सी पाजतो. लस्सी बनवण्यासाठी आपल्या गावातून आम्ही शुद्ध देशी दूध आणतो आणि मग त्याचे याठिकाणी दही बनवून लस्सी बनवली जाते.
किंमत किती माहितीए का -
याठिकाणी छोटी लस्सीची किंमत ही 30 रुपये आणि मोठ्या लस्सीची किंमत ही 50 रुपये आहे. मागील दहा वर्षात लालमन लस्सी यांच्या दुकानावर येणारे ग्राहक सुशील शर्मा म्हणाले की, त्यांना लस्सी प्यायल्यावर मोठा आनंद मिळतो. इतक्या भीषण उकाड्यात लोक याठिकाणची लस्सी पिऊन स्वत:ला उकाड्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच याठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते.