छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानदिनी शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी डीजेवर गाणी वाजवल्याने अभिजीत बिचुकले चांगलेच संतापले आहेत. तुमच्या कार्यकर्त्यांना इतिहास शिकविण्याची गरज आहे, अशा शब्दात बिचुकलेने शिवेद्रराजेंसहित कार्यकर्त्यांना सुनावले.
संभाजीराजेंच्या बलिदानदिनी DJ लावता, तुमचा राजघराण्यात जन्म, तुम्हाला किंमत आहे का?
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानदिनी मंत्र्यांचे कार्यकर्ते डॉल्बी लावून गाणे वाजवत असाल तर ही लज्जास्पद गोष्ट आहे. मंत्री शिवेंद्रराजे यांचा वाढदिवस 30 मार्चला असतो. शिवेंद्रराजे तुम्ही राजघराणात जन्माला आला त्याची तुम्हाला किंमत आहे का? छत्रपती घराण्यात जन्माला येऊन तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचां अपमान करत आहे. त्यामुळे तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अभिजीत बिचुकले यांनी केली आहे.
advertisement
वाढदिवस ३० मार्चला असताना संभाजी महाराजांच्या बलिदानदिनी तुम्ही डीजेचा दणदणाट करून वाढदिवस साजरा करीत असाल तर तुम्हाला राजघराण्यात जन्म झाल्याची किंमत आहे का? असा सवाल बिचुकले यांनी केला.
तुमच्या यशात माझाही फार मोठा वाटा, वेळ आल्यावर सगळं सांगेन
साताऱ्यात वाढदिवसाचे अनधिकृत बॅनर लावता, मंत्री झालात म्हणून एवढा मोठा वाढदिवस साजरा करता, पण एवढं लक्षात ठेवा की तुमच्या यशात माझाही फार मोठा वाटा आहे, वेळ आल्यावर मी सगळ्या गोष्टी जगासमोर सांगतो, असा इशाराही त्यांनी जाताजाता दिला.