TRENDING:

अजितदादांचा अपघात सकाळी 8.45 ला मग सापडलेल्या घड्याळात 9 का वाजले होते? रोहित पवारांनी रहस्य उलगडलं

Last Updated:

अजित पवार यांच्या मनगटावर असलेल्या घड्याळामुळे त्यांची ओळख पटल्याची माहिती रोहित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारीला बारामतीत दुर्दैवी विमान अपघात झाला. या अपघाताने संपूर्ण राज्य हादरले होते.  या अपघाताबाबत सर्वसामान्यांसह पवार कुटुंबाच्या मनातही अनेक शंका असल्याचे चर्चा रंगल्या आहेत. दादा परत येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान आता आमदार रोहित पवार हे आज पत्रकार परिषद सर्व चर्चांवर उत्तर दिले आहे. दादांच्या मृतदेहाची ओळख ही त्यांच्या घड्याळावरून पटली.
News18
News18
advertisement

मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या खासगी चार्टर्ड विमानाचे लँडिंगदरम्यान नियंत्रण सुटल्याने ते शेतात कोसळले आणि भीषण आग लागली. या अपघातात अजित पवारांसह विमानातील इतर सर्व ५ जणांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की विमान पूर्णपणे जळून खाक झाले आणि मृतदेह ओळखणे अत्यंत कठीण झाले होते. अशा परिस्थितीत अजित पवार यांच्या मनगटावर असलेल्या घड्याळामुळे त्यांची ओळख पटल्याची माहिती रोहित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

advertisement

काय म्हणाले रोहित पवार? 

रोहित पवार म्हणाले, मी माहिती आणली आहे. तोही लोक म्हणतील की ही माहिती कुठून आणि कशी आली.. खरं काय घडलं ते माहिती व्हावे यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आहे. सकाळी ८.४३ ते ८.४५ दरम्यान हा अपघात झाला आहे. विमान हवेत तिरकस होऊन थाली पडले. विमानचा आवाज त्यादिवशी नेहमीपेक्षा वेगळा होता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. आम्ही सरकारमध्ये नाही,  खरं काय घडलं ते माहिती व्हावे यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यामुळे तपास यंत्रणा ज्या काही आहे, त्यांनी प्रयत्न केला तर रहस्य समोर येईल.

advertisement

अपघातानंतर अजित पवारांच्या कोणत्या वस्तू सापडल्या? 

अजितदादांचे स्वेटर, त्यांची चप्पल, त्यांच्या हातातील घड्याळ जे ते रोज घालायचे ते पाहिले आहे. दादांच्या घड्याळात ९ वाजले होते. अपघात सकाळी पावणे ९ च्या सुमारास झाला, मात्र अजितदादा हे त्यांचे घड्याळ कायम १५ मिनिटे पुढे ठेवायचे ... जे आपल्याला सगळ्यांना वाटतय की दादा आपल्यातून गेले नाही तर ते सत्य आहे. दादा आपल्याात नाही पण दादांचे विचार मात्र आपल्यात आहे, असे रोहित पवार म्हणाले.

advertisement

घड्याळानेच त्यांची ओळख पटवली

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रासायनिक खतामुळे दुष्परिणाम, अशी करा नैसर्गिक शेती, उत्पादनात होईल भरघोस वाढ
सर्व पहा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह आहे. आतापर्यंतच्या बहुतांश सर्वच निवडणुका अजित पवार यांनी घड्याळ चिन्हावरतीच लढल्या आहेत. यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये देखील अजित पवार सातत्याने घड्याळाचा आलाराम वाजवा घड्याळाला मतदान करा असं सांगताना पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे चिन्ह म्हणून घड्याळ हे त्यांची ओळख बनले होते आणि आज शेवटच्या क्षणीही त्यांनी हातात घातलेल्या घड्याळाने   त्यांची ओळख पटवली असल्याचं सांगितलं जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांचा अपघात सकाळी 8.45 ला मग सापडलेल्या घड्याळात 9 का वाजले होते? रोहित पवारांनी रहस्य उलगडलं
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल