प्लम केक साठी लागणारे साहित्य: एक वाटी मैदा, अर्धी वाटी साखर,पाव वाटी बटर, पाव वाटी तेल, अर्धी वाटी दही, व्हॅनिला इसेन्स आणि दोन टी स्पून बेकिंग सोडा, दोन वाट्या ऑरेंज ज्यूस, थोडीशी चेरी, बदाम,काजू, खजूर, एप्रिकॉट, किसमिस, रेड क्राइमबेरी किंवा तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट देखील ॲड करू शकता एवढं साहित्य लागेल.
advertisement
सुरुवातीला एका मोठ्या भांड्यामध्ये बटर त्यामध्ये साखर टाकायची आणि त्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचं हे सगळं एकत्र फेटून घ्यायचं. हे फेटून झाल्यानंतर याला थोडं बाजूला ठेवायचं. आपण जो ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे त्यामध्ये हे सर्व ड्रायफ्रूट टाकायचे आणि त्यांना व्यवस्थित त्या भिजत ठेवायचं. याला रात्रभर भिजत ठेवावे लागतात पण जर तुम्ही रात्रभर भिजत ठेवलं नसेल तर तुम्ही याला दोन मिनिटांसाठी मायक्रोवेव्हमध्ये देतील ठेवू शकता जेणेकरून हे सॉफ्ट होतील.
अशा पद्धतीने हे ड्रायफ्रूट तुम्ही भिजू घालायचे आहेत. त्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे साखर बटर आणि तेलाचं त्यामध्ये आपल्याला दही टाकायचं दही फेटून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये परत मैदा टाकायचा पाच ते सहा थेंब हे व्हॅनिला फ्लेवरच इसेन्स टाकायचं आणि दोन चमचे बेकिंग सोडा टाकायचा आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर आपले जे भिजवलेले ड्रायफ्रूट आहे त्यामधला रस बाजूला करून हे सर्व त्यामध्ये टाकायची आणि एकत्रित एकजीव करून घ्यायचं आणि गरज भाजल्यात त्यामध्ये थोडसं तो रस टाकायचा.
हे सर्व एकत्र केल्यानंतर एक तुम्ही भांड घ्यायचं त्यामध्ये तुम्ही केक तयार करण्यासाठी लागणार भांडं देखील घेऊ शकता त्यामध्ये तेल लावायचं आणि त्याच्यावरून थोडा मैदा टाकून ते व्यवस्थित रित्या स्प्रेड करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण तयार केलं मिश्रण त्यामध्ये टाकायचं आणि वरतून थोडेसे चॉकलेटचे तुकडे टाकायचे आणि याला तुम्ही 180 डिग्री सेल्सियस ला अर्धा ताससाठी ठेवायचं. आणि जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही कडे मध्ये देखील हा केक तयार करू शकतात 40 मिनिटांमध्ये हा केक कढईमध्ये बनवून तयार होतो.