नागपूरला मोर्चा वडेट्टीवार यांनी काढला मात्र त्यालाआमचा विरोध नाही. पक्ष बाजूला ठेवून अंबडला सोबत आले. हिंगोली, नगर, बीडला आले नाही कुठले प्रेशर त्यांच्यावर आले माहीच नाही. वडेट्टीवार डबल ढोलकी आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे असे मत होते. आता काय सांगायचं वडेट्टीवार तुम्ही एकच मुद्दा घ्या आम्ही तुमच्या सोबत आहोत. म्हणून मी नागपूरला गेलो नाही. तासातासाला बदलले तर नुकसान होईल. पक्षाच्या दावणीला बांधलो नाहीत, तुम्ही राजकारण करू नका. वारंवार तुम्ही बदलत असाल तर हे चालणार नाही, असा इशारा छगन भुजबळांनी दिला आहे.
advertisement
तुमच्या लोकांना आवरा, भुजबळांचा भाजपला इशारा
जे जे ओबीसीच्या मुळावर उठले असेल त्यांना आडवं करा... आम्ही विखेंना सुद्धा सोडणार नाही त्यांना सुद्धा सोडणार नाही गप्प बसणार नाही. भाजपला सांगतोय तुमच्या लोकांना आवरा, आम्ही कोर्टात जाऊ रस्त्यावर लढू.. गोरगरीब पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरंज्या उतरायला लावल्याशिवाय राहणार नाही, असेही छगन भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ संतापले
आम्ही किती गप्प बसायचं..374 जाती साठी बोललो तर जातीवादी म्हणतात. तुमच्या आरक्षणाला कुठे धक्का लागला आहे. लाख-दोन लाख तर आणखी दोन लाख टाकले तर आमचे मानगुटीवर बसतील की नाही.. आम्ही गप्प बसायचा आणि मराठा समाजाला बोकांडी बसून घ्यायचं, असेही भुजबळ म्हणाले.
विरोधात भूमिका घेतली त्यांना बरोबर डोक्यात ठेवा : छगन भुजबळ
मी सांगतो अजूनही सांभाळा त्या पाटलाच्या पाठीमागे मराठा समाजाने आवाज उठवला पाहिजे आम्हाला असं नेतृत्व मान्य नाही. सगळ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केले एवढेच मला सांगायचं, येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी ज्यांनी तुमच्या विरोधात भूमिका घेतली त्यांना बरोबर डोक्यात ठेवा आणि त्यांचा बरोबर हिशोब करा, असेही भुजबळ म्हणाले.