गेल्या 24 तासांमध्ये छत्रपती संभाजी नगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटीमध्ये तब्बल 18 जणांच्या मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यावर रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्टीकरण देखील देण्यात आलं आहे. औषधांच्या तुटवड्याने किंवा डॉक्टरांच्या कमतरतेमुळे, हालगर्जीपणामुळे हे मृत्यू झाले नसून, यातील अनेक जण हे मरणासन्न अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल झाले होते, अशी माहिती डीन संजय राठोड यांनी दिली आहे.
advertisement
रुग्णांचा मृत्यू कशामुळे झाला?
1)हृदय विकाराच्या झटक्याने - 2 मृत्यू
2)निमोनियाने - 2 मृत्यू
3)किडनी निकामी झाल्याने -3 मृत्यू
4)लिव्हर निकामी झाल्याने -1 मृत्यू
5)लिव्हर आणि किडनी दोन्ही निकामी -1 मृत्यू
6)विष प्राशन केल्याने -1मृत्यू
7)रस्ता अपघात -1 मृत्यू
8)अपेंडिक्स पोटात फुटून पू झाल्याने -1 मृत्यू.
9)वजन कमी असल्याने प्रि मॅच्युअर नवजात बालक - 2 मृत्यू.
10) ब्रेनडेड - 4 मृत्यू
नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?
हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे, अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधपुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत आहे. असाच धक्कादायक प्रकार नांदेड मधल्या शासकीय रुग्णालयातून पुढे आला आहे. तिथे 31 रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला असून त्यात गंभीर बाब म्हणजे बारा नवजात बालकांचाही मृतात समावेश आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत. या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मृतांमध्ये बाहेरच्या रुग्णाचा जास्तीचा समावेश होता असा दावा केला आहे. शिवाय रुग्ण गंभीर होते असे स्पष्टीकरण दिले आहे.