TRENDING:

मूर्ती लहान पण...! पुणेकर चिमुकल्याची 'आकाश' भरारी, थेट लघुग्रहाला देणार नाव, Video

Last Updated:

Pune News: आरुष जोशी याने अगदी लहान वयात केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याला लघुग्रहांना स्वतःचे नाव देण्याचा बहुमान मिळणार आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ ही म्हण पुणेकर चिमुकल्याने खरी करून दाखवली आहे. पुण्यातील आरुष जोशी याने आपल्या मेहनतीच्या आणि चिकाटीच्या जोरावर वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी मोठी कामगिरी केली आहे. सध्या पाचवीत शिकणाऱ्या आरुषने चक्क दोन लघुग्रहांचा शोध लावला आहे. हे दोन्ही लघुग्रह मंगळ आणि गुरू ग्रहांच्या दरम्यान असलेल्या मुख्य लघुग्रह पट्ट्यात आढळून आले आहेत.
advertisement

आरुष जोशी याने अगदी लहान वयात केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याला लघुग्रहांना स्वतःचे नाव देण्याचा बहुमान मिळणार आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.

IASC कडून आरुषच्या संशोधनाला मान्यता

आरुष जोशी याने सांगितले की त्याला लहानपणापासूनच अवकाशाबद्दल खूप आकर्षण आहे. त्यामुळे तो अवकाशाशी संबंधित पुस्तके वाचायचा, माहिती शोधायचा आणि व्हिडिओ पाहायचा. याच सगळ्यातून त्याला प्रेरणा मिळाली. आरुषकडे 150 मिमी व्यासाची दुर्बीण असून, त्याच्या मदतीने तो चंद्र, सूर्यमालेतील विविध ग्रह तसेच अँड्रोमेडा दीर्घिकेसारख्या आकाशातील गोष्टींची निरीक्षणे करतो.

advertisement

View More

आरुषने अलीकडे नासा संलग्न इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल सर्च कोलॅबोरेशन (IASC) या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमामध्ये जगभरातील नागरिक शास्त्रज्ञांना अवकाशाशी संबंधित दर्जेदार माहिती दिली जाते. या माहितीच्या आधारे लघुग्रहांचा शोध घेतला जातो.

या उपक्रमांतर्गत आरुषने आपल्या सहकाऱ्यांसोबत अडीच वर्षांहून अधिक काळ सातत्याने निरीक्षणे केली. मेहनत आणि चिकाटीमुळे त्याला यश मिळाले असून, आरुषने शोधलेल्या लघुग्रहांना IASC कडून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.

advertisement

नव्याने शोधलेले हे दोन लघुग्रह सध्या 2024 OQ 27 आणि 2024 OB 28 या तात्पुरत्या नावांनी ओळखले जात आहेत. या शोधांची अधिकृत नोंद आणि पडताळणी मायनर प्लॅनेट सेंटरकडून करण्यात आली आहे. सध्या हे लघुग्रह प्रोव्हिजनल डिस्कव्हरी म्हणजेच तात्पुरत्या शोधाच्या वर्गात समाविष्ट आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मूर्ती लहान पण...! पुणेकर चिमुकल्याची 'आकाश' भरारी, थेट लघुग्रहाला देणार नाव, V
सर्व पहा

आता पुढील काही वर्षे या लघुग्रहांचे बारकाईने निरीक्षण केले जाणार आहे. सूर्याभोवती फिरण्याची कक्षा निश्चित झाल्यानंतर आरुषला या लघुग्रहांना कायमस्वरूपी नावे देण्याचा मान मिळणार आहे. एवढ्या लहान वयात आरुषने ही कामगिरी केल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
मूर्ती लहान पण...! पुणेकर चिमुकल्याची 'आकाश' भरारी, थेट लघुग्रहाला देणार नाव, Video
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल