advertisement

Pune Crime: ऑर्डर वेळेवर पोहोचली नाही म्हणून इतका राग? पुण्यात चौघांचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

Last Updated:

केवळ 'ऑर्डर उशिरा आली' या कारणावरून रक्ताळले जाईपर्यंत मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.

डिलिव्हरी बॉयला मारहाण (AI Image)
डिलिव्हरी बॉयला मारहाण (AI Image)
पुणे : कडाक्याच्या थंडीत आणि रात्रीच्या अंधारात पोट हातावर घेऊन काम करणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयसोबत भयंकर घटना घडली. त्याला केवळ 'ऑर्डर उशिरा आली' या कारणावरून रक्ताळले जाईपर्यंत मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. आंबेगाव येथील वाघजाई नगरमध्ये ४ फेब्रुवारीच्या रात्री हा संतापजनक प्रकार घडला असून, पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे.
नेमकं काय घडलं?
जुबेर अहमद रशिद शेख (वय ३५) हे झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. रात्री साडेअकराच्या सुमारास ते विकास काशिनाथ धोत्रे याच्या घरी जेवणाची ऑर्डर घेऊन गेले होते. मात्र, काही कारणांमुळे डिलिव्हरीला थोडा उशीर झाला. याच गोष्टीचा राग मनात धरून विकास धोत्रे आणि त्याच्या तीन साथीदारांनी जुबेर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
advertisement
बांबूने सपासप वार आणि पोलिसांची एन्ट्री
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी माणुसकीला तिलांजली देत जुबेर यांना लाकडी बांबूने आणि हाताने बेदम मारहाण केली. जुबेर मदतीसाठी ओरडत असतानाही ही टोळी त्यांना मारत राहिली. सुदैवाने, त्याच वेळी आंबेगाव पोलीस ठाण्याचे मार्शल गस्तीवर होते. पोलिसांची गाडी पाहताच आरोपींचे धाबे दणाणले आणि तिघे साथीदार तिथून पसार झाले. पोलिसांनी मुख्य आरोपी विकास धोत्रेला ताब्यात घेतले आहे.
advertisement
डिलिव्हरी पार्टनर्सच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
जुबेर शेख यांनी याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चौघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार लोहार पुढील तपास करत आहेत. १०-१५ मिनिटांच्या उशिरासाठी एका कष्टकरी माणसाला अशा प्रकारे मारहाण होणे, हे पुणेकरांच्या सुसंस्कृतपणाला धक्का लावणारे आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: ऑर्डर वेळेवर पोहोचली नाही म्हणून इतका राग? पुण्यात चौघांचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement