advertisement

यवतमाळमध्ये ठाकरे गटाच्या नेत्याचं कुटुंबासह अपहरण, डोक्याला बंदूक लावली, निर्जनस्थळी नेत...

Last Updated:

यवतमाळमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद उर्फ शाखा भरवाडे यांचे त्यांच्या कुटुंबासह अपहरण करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

News18
News18
भास्कर मेहरे, प्रतिनिधी यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महागाव नगर पंचायतीचे उपाध्यक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद उर्फ शाखा भरवाडे यांचे त्यांच्या कुटुंबासह अपहरण करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. डोक्याला पिस्तुल लावून हे अपहरण करण्यात आल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

तक्रार मागे घेण्यासाठी 'फिल्मी' थरार

मिळालेल्या माहितीनुसार, पुसद येथील एका संस्थेच्या आर्थिक व्यवहार किंवा गैरप्रकाराबाबत प्रमोद भरवाडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली होती. हीच तक्रार मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता. मात्र, त्यांनी दाद न दिल्याने अज्ञात आरोपींनी अपहरणाचा कट रचला. अपहरणकर्त्यांनी भरवाडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचंही बंदूकीच्या धाकाने अपहरण केलं.
advertisement

नांदेडच्या हद्दीत नेऊन घेतल्या स्वाक्षरी

हल्लेखोरांनी भरवाडे आणि त्यांच्या कुटुंबाला गाडीत बसवून थेट नांदेड जिल्ह्यातील हदगावच्या हद्दीत नेले. तिथे डोक्यावर पिस्तूल लावून, तक्रार मागे घेण्यासंदर्भात किंवा अन्य काही कोऱ्या कागदपत्रांवर जबरदस्तीने स्वाक्षरी घेतल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे भरवाडे कुटुंब प्रचंड दहशतीखाली आहे.

निर्जनस्थळी सोडून आरोपी फरार

आपला हेतू साध्य झाल्यानंतर अपहरणकर्त्यांनी भरवाडे कुटुंबाला हिंगोली-वाशीम रोडवरील एका निर्जनस्थळी सोडून दिले आणि तिथून पळ काढला. सुदैवाने कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित आहेत, परंतु या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. इतकी मोठी घटना घडूनही अद्याप याप्रकरणी अधिकृतपणे पोलीस तक्रार दाखल झालेली नाही. भरवाडे कुटुंब अद्याप या धक्क्यातून सावरलेले नसल्याने किंवा दहशतीमुळे त्यांनी तक्रार दिली नसल्याची चर्चा आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
यवतमाळमध्ये ठाकरे गटाच्या नेत्याचं कुटुंबासह अपहरण, डोक्याला बंदूक लावली, निर्जनस्थळी नेत...
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement