Vaibhav Sooryavanshi : वर्ल्ड कप जिंकल्यानंतर वैभव सूर्यवंशीचा पहिला शब्द काय होता?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Vaibhav Sooryavanshi Emotional first word : विजयानंतर वैभवचा एक भावनिक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मॅच संपल्यावर त्याने आपल्या वडिलांना व्हिडिओ कॉल केला आणि 'पप्पा, प्रणाम' म्हणत आशीर्वाद घेतले.
Vaibhav Sooryavanshi Call to Papa : भारताच्या युवा संघाने अंडर-19 वर्ल्ड कप फायनलमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत इंग्लंडवर 100 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने सहाव्यांदा या वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपले नाव कोरलं. या मॅचमध्ये 14 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आपल्या बॅटिंगने सर्वांची मनं जिंकली. त्याने केलेल्या तुफानी खेळीमुळे भारताला विश्वविजेतेपदाचा मान मिळाला आहे. वैभव सूर्यवंशी याने या मॅचमध्ये केवळ 80 बॉलमध्ये 175 धावांची अविश्वसनीय इनिंग खेळली. अशातच वर्ल्ड कप जिंकल्यानंतर वैभव सूर्यवंशीचा पहिला शब्द काय होता? याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
'पप्पा, प्रणाम'...
विजयानंतर वैभवचा एक भावनिक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मॅच संपल्यावर त्याने आपल्या वडिलांना व्हिडिओ कॉल केला आणि 'पप्पा, प्रणाम' म्हणत आशीर्वाद घेतले. राजस्थान रॉयल्सने हा फोटो शेअर केला असून चाहत्यांनी या युवा खेळाडूच्या नम्रतेचे मोठं कौतुक केलं आहे. एवढं मोठं यश मिळवूनही वैभवने जमिनीवर पाय ठेवून आपल्या यशाचं श्रेय टीमला दिलं.
advertisement
बॉलर्सची पळता भुई थोडी केली
वैभव सूर्यवंशी याने आपल्या या खेळीत 15 फोर आणि 15 सिक्स मारत इंग्लंडच्या बॉलर्सची पळता भुई थोडी केली. अंडर-19 स्तरावर त्याने केवळ 71 बॉलमध्ये 150 धावा पूर्ण करून नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला. कोणत्याही आयसीसी टूर्नामेंटच्या फायनलमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रमही आता वैभवच्या नावावर जमा झाला आहे.
advertisement
“Papa, pranaam” pic.twitter.com/ybLnnkjg64
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) February 6, 2026
'प्लेअर ऑफ द मॅच'
पुरस्कार सोहळ्यात वैभवने आपला 'प्लेअर ऑफ द मॅच' हा अवॉर्ड टीमच्या सपोर्ट स्टाफला समर्पित केला. त्याने सांगितले की, "गेल्या 7-8 महिन्यांपासून सपोर्ट स्टाफने आमच्यासाठी घेतलेली मेहनत खूप मोलाची आहे." सध्या क्रिकेट वर्तुळात वैभव सूर्यवंशी याच्या नावाची मोठी चर्चा सुरू असून, त्याला भारतीय क्रिकेटमधील आगामी सुपरस्टार मानले जात आहे.
advertisement
Vaibhav Suryavanshi’s father interview after the U19 World Cup victory. pic.twitter.com/AaL2QZnKGT
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 7, 2026
411 धावांचा डोंगर
दरम्यान, या मॅचमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता, जो वैभवने पूर्णपणे चुकीचा ठरवला. भारताने वैभवच्या शतकाच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 411 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 40.2 ओव्हरमध्ये 311 रन्सवर ऑल आऊट झाला. इंग्लंडकडून कॅलेब फाल्कनरने 115 धावांची झुंजार खेळी केली, पण ती टीमला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 10:29 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Sooryavanshi : वर्ल्ड कप जिंकल्यानंतर वैभव सूर्यवंशीचा पहिला शब्द काय होता?







