advertisement

होळीला गावी जाताय? मध्य रेल्वेचं मोठं गिफ्ट, 209 विशेष गाड्या धावणार, पाहा मार्ग

Last Updated:

Central Railway: दरवर्षी होळीच्या काळात पुण्यातून हजारो प्रवासी महाराष्ट्रातील विविध भागात जातात. यंदा रेल्वेनं होळीसाठी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Central Railway: होळीला गावी जाताय? मध्य रेल्वेचं मोठं गिफ्ट, 209 विशेष गाड्या धावणार, पाहा मार्ग
Central Railway: होळीला गावी जाताय? मध्य रेल्वेचं मोठं गिफ्ट, 209 विशेष गाड्या धावणार, पाहा मार्ग
पुणे : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील विविध शहरांसाठी तब्बल 209 विशेष गाड्या चालविण्याचे नियोजन केले आहे. या विशेष गाड्यांमध्ये वातानुकूलित (एसी) विशेष गाड्या, वातानुकूलित सह शयनयान, तसेच सामान्य द्वितीय श्रेणीचे कोच असलेल्या अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे सणाच्या काळात घराकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या मुंबई-नागपूर-मुंबई, मुंबई-रत्नागिरी-मुंबई, मुंबई-चिपळूण-मुंबई, तसेच इतर महत्त्वाच्या मार्गांवर धावणार आहेत. दरवर्षी होळीच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नियमित गाड्यांवर प्रचंड ताण येतो. ही गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
advertisement
भारतीय रेल्वेने देशपातळीवर होळीनिमित्त 1 हजार 410 विशेष गाड्या चालविण्याची योजना आखली असून, त्यामध्ये मध्य रेल्वेचा वाटा जवळपास दोनशेहून अधिक गाड्यांचा आहे. यंदा प्रवासी सुविधांवर विशेष भर देण्यात आला असून, विविध स्थानकांवर पुरेशा संख्येने तिकीट काउंटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच ऑनलाईन तिकीट बुकिंग व्यवस्थेलाही अधिक सक्षम करण्यात आले आहे.
advertisement
पुणे हे मध्य रेल्वेतील महत्त्वाचे केंद्र असल्याने येथून उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. दरवर्षी होळीच्या काळात पुण्यातून हजारो प्रवासी दानापूर, गोरखपूर, मुझफ्फरपूर आदी ठिकाणी जातात. ही वाढती मागणी लक्षात घेऊन पुणे-दानापूर, पुणे-गोरखपूर आणि पुणे-मुझफ्फरपूर मार्गावर अधिक फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वेळेआधी तिकीट आरक्षण करण्याचे आवाहन केले असून, अधिकृत रेल्वे संकेतस्थळ व ॲपद्वारेच तिकीट काढण्याचे सुचविले आहे. होळी सणाच्या काळात सुरक्षित, सोयीस्कर आणि तणावमुक्त प्रवासासाठी मध्य रेल्वे सज्ज असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
होळीला गावी जाताय? मध्य रेल्वेचं मोठं गिफ्ट, 209 विशेष गाड्या धावणार, पाहा मार्ग
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement