Virat Kohli Interview : कोहली 'विदेशी प्लेयर' असल्याचा गंभीर आरोप! LIVE शोमध्ये विराट भडकला, 'बाहेर भेट तुला बघतो...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mr Nags virat kohli Interview : आरसीबी चार नाही तर पाच ओव्हरसीस प्लेयर्ससोबत खेळतीये, असं नॅग्सने म्हणताच विराट कोहलीला हसू आवरलं नाही.
Mr Nags virat kohli Interview : सोशल मीडियावर अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. लोक म्हणतायेत की आरसीबी चार नाही तर पाच ओव्हरसीस प्लेयर्ससोबत खेळतीये, असं नॅग्सने म्हणताच विराट कोहलीला हसू आवरलं नाही. मला कळत नाहीये की, असं का म्हटलं जातंय, असं नॅग्सने म्हणताच विराटने उलट प्रश्न केला. तु मला हा प्रश्न का विचारतोय? त्या ओव्हरसीस प्लेयर्सला विचार ना, असं मिस्टर नॅग्स म्हणाला. तुला वाटतंय का, मी विदेशी प्लेयर आहे? नाही ना... असं म्हणत विराटने भन्नाट उत्तर दिलं.
बाहेर भेट तुला बघतो मी... - विराट
नॅग्सच्या प्रश्नाचा सूर विराटने ओळखला होता. विराट लंडनला राहतो, यावरून मिस्टर नॅग्सने गुगली टाकली होती. त्यानंतर विराटने मस्करीत नॅग्सला धमकी देखील दिली. बाहेर भेट तुला बघतो मी... असं विराट हसत हसत म्हणाला. दोघांच्या भेटीचा हा भन्नाट व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. यंदाच्या वर्षातील हा सर्वात प्रतिक्षेत असणारा व्हिडीओ होता.
advertisement
Will AI finally take Mr. Nags’s job?
In this episode of the OG legends of ‘uru talk about haircuts, speculations on Social Media, and Virat’s debut in… pic.twitter.com/vvUcaSo3cu
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 4, 2026
आपण राजा बाबू करू... मी शक्ती कपूरचा रोल करतो
advertisement
ट्रॉफी जिंकल्यानंतर कसं वाटतं? असा प्रश्न केल्यावर विराटने आनंद व्यक्त केला. त्यावेळी त्याने नॅग्सची शाळा घेतली. माझ्या मागं माकड होतं, तरी देखील मी सेलीब्रेशन केलं, असं म्हणत नॅग्सला विराटने माकडाचा दर्जा दिला. यावरून नॅग्सने विराटची फिरकी घेतल्याचं पहायला मिळालं. विराटने यावेळी नॅग्सला ऑफर दिली. आपण राजा बाबू करू... मी शक्ती कपूरचा रोल करतो, असं विराट यावेळी म्हणाला.
advertisement
विराटला चिमटा काढला
दरम्यान, इंग्लंडमध्ये राहून तू चांगली इंग्लीश शिकलाय, असं म्हणत नॅग्सने पुन्हा विराटला चिमटा काढला. पुढच्या वर्षी मी तुझ्या शोमध्ये येणार नाही. मी पुढच्या वर्षी कुठं तरी बसून AI च्या मदतीने शो करेन, असं विराट यावेळी म्हणाला. विराट यावेळी मस्तीच्या मुडमध्ये दिसत होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 11:25 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virat Kohli Interview : कोहली 'विदेशी प्लेयर' असल्याचा गंभीर आरोप! LIVE शोमध्ये विराट भडकला, 'बाहेर भेट तुला बघतो...'










