advertisement

Mumbai Local: मुंबईकर रविवारी खोळंबा होणार, तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, कधी आणि कुठं, पाहा सविस्तर

Last Updated:

Mumbai Local: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mumbai Local: मुंबईकर रविवारी खोळंबा होणार, तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, कधी आणि कुठं, पाहा सविस्तर
Mumbai Local: मुंबईकर रविवारी खोळंबा होणार, तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, कधी आणि कुठं, पाहा सविस्तर
मुंबई: लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रविवारी घराबाहेर पडताना लोकलचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावं लागेल. 8 फेब्रुवारी रोजी देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य, पश्चिम तसेच हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळपासून दुपारपर्यंत अनेक लोकल सेवा रद्द किंवा मार्ग बदलून धावणार आहेत.
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 वाजेपर्यंत लागू असेल. या कालावधीत मशीद बंदर, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि कुर्ला या स्थानकांवर लोकल गाड्या थांबणार नाहीत. त्यामुळे या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागणार आहे.
advertisement
पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक
पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप व डाउन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकचा कालावधी सकाळी 10:00 ते दुपारी 3:00 वाजेपर्यंत असेल. या काळात विले पार्ले आणि राम मंदिर स्थानकांवर लोकल सेवा थांबणार नाही. मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी चर्चगेट ते गोरेगाव दरम्यान हार्बर मार्गावरील लोकल सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
advertisement
हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील परिणाम
हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान अप व डाउन मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 4:05 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत पनवेल ते सीएसएमटी हार्बर मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या रद्द राहतील. तसेच पनवेल ते ठाणे दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत.
पर्यायी व्यवस्था
प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येतील. ठाणे ते वाशी आणि नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा सुरू राहतील. तसेच पोर्ट मार्गावरील लोकल सेवा नेहमीप्रमाणे नियमित चालू राहणार आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासाची योग्य आखणी करण्याचे आवाहन केले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: मुंबईकर रविवारी खोळंबा होणार, तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, कधी आणि कुठं, पाहा सविस्तर
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement