Ben Stokes Injury : डोळा काळानिळा पडला, नाक रक्तबंबाळ! वर्ल्ड कपच्या तोंडावर बेन स्टोक्ससोबत धक्कादायक घटना, काय घडलं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ben Stokes Injury : बेन स्टोक्सने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून या जखमेचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याच्या डोळ्याच्या खालचा भाग पूर्णपणे काळा निळा पडलेला दिसतोय.
Ben Stokes face injury photo viral : भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी इंग्लंडचा संघ भारतात पोहोचला आहे. अशातच आता इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड क्रिकेट टीमचा कसोटी कॅप्टन आणि स्टार ऑलराउंडर बेन स्टोक्स सध्या एका मोठ्या अपघातामुळे चर्चेत आला आहे. स्टोक्सच्या चेहऱ्याला अत्यंत गंभीर दुखापत झाली असून त्याचे सोशल मीडियावरील फोटो पाहून चाहते हादरले आहेत. या दुखापतीमुळे त्याचा चेहरा ओळखणेही कठीण झाले असून क्रिकेट विश्वातून त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
डोळ्याच्या खालचा भाग पूर्णपणे काळानिळा
बेन स्टोक्सने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून या जखमेचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याच्या डोळ्याच्या खालचा भाग पूर्णपणे काळा निळा पडलेला दिसत असून नाकावरही जखमांच्या खुणा स्पष्टपणे जाणवत आहेत. प्रॅक्टिस दरम्यान वेगाने आलेला बॉल थेट त्याच्या चेहऱ्यावर आदळल्याने ही भीषण दुखापत झाली असल्याचे समोर आले आहे. या घटनेचे गांभीर्य स्टोक्सने लिहिलेल्या कॅप्शनवरून लक्षात येतं.
advertisement
डोळा गमवावा लागला
बेन स्टोक्सने फोटोसोबत लिहिलंय की, "तुम्ही या बॉलची अवस्था देखील पाहायला हवी होती." यावरून तो बॉल किती वेगाने आणि जोरात लागला असेल, याचा अंदाज येतो. जर हा बॉल केवळ एक इंच वर लागला असता, तर स्टोक्सला आपला डोळा गमवावा लागला असता, ज्यामुळे त्याचे करिअर कायमचे संपलं असतं. बेन स्टोक्स आणि दुखापतींचे जणू जुने नातं राहिलंय.
advertisement
मॅचमधून बाहेर बसावे लागले
यापूर्वीही अनेकदा मैदानातील जखमांमुळे किंवा फिटनेसच्या कारणास्तव त्याला मॅचमधून बाहेर बसावे लागले आहे. कधी गुडघ्याची दुखापत तर कधी बोटाचे फ्रॅक्चर, अशा अनेक समस्यांचा सामना करत त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. मात्र, चेहऱ्याला झालेली ही जखम अत्यंत धोकादायक मानली जात आहे.
बेन स्टोक्स संघात समाविष्ट नाही
advertisement
दरम्यान, इंग्लंडचा टी-20 संघ वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात पोहोचला आहे. मात्र, बेन स्टोक्स संघात समाविष्ट नाही. कारण त्यांनी व्हाइट बॉल क्रिकेटच्या दोन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे.
इंग्लंड क्रिकेट संघ (England cricket team) : हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, टॉम बँटन (विकेटकीपर), जेकब बेथेल, जोस बटलर (विकेटकीपर), सॅम करन, लियाम डॉसन, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, फिल सॉल्ट (विकेटकीपर), जोश टंग, ल्यूक वुड.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 10:57 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Ben Stokes Injury : डोळा काळानिळा पडला, नाक रक्तबंबाळ! वर्ल्ड कपच्या तोंडावर बेन स्टोक्ससोबत धक्कादायक घटना, काय घडलं?







