पुण्यातील त्या कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर नेमकं काय सुरू होतं? 2 महिला अन्.. रूममधलं दृश्य पाहून सगळेच चक्रावले
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुण्यातील उत्तमनगर परिसरात एका आलिशान कॉम्प्लेक्समधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे
पुणे : पुण्यातील उत्तमनगर परिसरात एका आलिशान कॉम्प्लेक्समधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाचा गुन्हे शाखेने थरारक छडा लावला आहे. सरस्वतीनगर येथील 'योगीराज कॉम्प्लेक्स'मधील एका बंद खोलीत पैशांचे आमिष दाखवून महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन पीडितांची सुटका केली आहे.
योगीराज कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर गेल्या काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी एक सापळा रचला. पोलिसांनी एका पंटरला 'बनावट ग्राहक' म्हणून त्या ठिकाणी पाठवले. ग्राहकाने इशारा करताच दबा धरून बसलेल्या पथकाने रूमवर धाड टाकली.
advertisement
पीडितांची सुटका
पोलिसांनी छापा टाकला तेव्हा तिथे दोन महिला आढळून आल्या, ज्यांना पैशांचे प्रलोभन दाखवून या नरकात ढकलण्यात आले होते. या व्यवसायाची मुख्य सूत्रधार गौरी विकास पवळे (वय ४५) हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरी पवळे ही गरजू महिलांना हेरून त्यांच्याकडून हा अनैतिक व्यापार करून घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
advertisement
याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार (PITA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत गोपनीयरीत्या केली. रहिवासी संकुलात अशा प्रकारे व्यवसाय सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्येही खळबळ उडाली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 12:51 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील त्या कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर नेमकं काय सुरू होतं? 2 महिला अन्.. रूममधलं दृश्य पाहून सगळेच चक्रावले







