Solapur: बायको माहेराहून येईना, भीमाने तिन्ही लेकरांना शेतात घेऊन गेला अन्...,घटनेनं अख्खं गाव हादरलं
- Published by:Sachin S
Last Updated:
गावकऱ्यांना घटनेची माहिती मिळाली, त्यांनी शेतात धाव घेतली आणि मुलांना तातडीने रुग्णालयात हलवलं.
प्रितम पंडित, प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूरमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका पित्याने आपल्या तीन लहान मुलांना विष पाजलं आणि त्यानंतर स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेत वडिलांचा दुर्दैवी मृत्यू तर तिन्ही मुलांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीमध्ये खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून या पित्याने हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावात ही दुर्दैवी घटना घडली. भीमा अण्णा वाघमारे (वय ३४) असं विष प्राशन केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. भीमा वाघमारे हे एका सिमेंटच्या कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. भीमा वाघमारे आणि त्यांच्या पत्नीत गेल्या अनेक दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरू होते.
बायको माहेराहून परत येईना
वाद इतके विकोपाला गेले की, दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. याच वादातून पत्नीने माहेरी निघून गेली होती. भीमा वाघमारे यांनी आणि नातेवाईकांनी पत्नीचे समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण पत्नीने सासरी येण्यास नकार दिला. याच निराशातून भीमा वाघमारे यांनी आपल्या जानवी, प्रगती आणि बाबू यांना वळसंग जवळील शेतात घेऊन गेले होते. त्याचवेळी त्या तिघांना विष देण्यात आलं आणि स्वतःही विष घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
advertisement
विष प्राशन केल्यामुळे शेतातच लेकरांजवळ भीमा वाघमारे यांचा मृत्यू झाला. गावकऱ्यांना घटनेची माहिती मिळाली, त्यांनी शेतात धाव घेतली आणि मुलांना तातडीने रुग्णालयात हलवलं. तिन्ही लहान मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Apr 01, 2026 11:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur: बायको माहेराहून येईना, भीमाने तिन्ही लेकरांना शेतात घेऊन गेला अन्...,घटनेनं अख्खं गाव हादरलं









