advertisement

IPL 2026 : विजय दिल्लीचा, पण टेन्शन रोहितला... मुंबईविरुद्धच्या सामन्यात एनगिडी हॅट्रिकवर!

Last Updated:

आयपीएल 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जाएंट्सचा पराभव केला आहे, पण दिल्लीच्या या विजयानंतर टेन्शन मात्र रोहितचं वाढलं आहे, कारण दिल्लीच्या एनगिडीला रोखण्याचं आव्हान रोहितसमोर चालून आलं आहे.

विजय दिल्लीचा, पण टेन्शन रोहितला... मुंबईविरुद्धच्या सामन्यात एनगिडी हॅट्रिकवर!
विजय दिल्लीचा, पण टेन्शन रोहितला... मुंबईविरुद्धच्या सामन्यात एनगिडी हॅट्रिकवर!
लखनऊ : आयपीएल 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जाएंट्सचा 6 विकेटने पराभव केला आहे. लखनऊने दिलेलं 142 रनचं आव्हान दिल्लीने 4 विकेट गमावून 17.1 ओव्हरमध्येच पार केलं. लखनऊच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने 26 रनवरच 4 विकेट गमावल्या होत्या, पण त्यानंतर समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी नाबाद राहून दिल्लीचा विजय निश्चित केला. समीर रिझवीने 47 बॉलमध्ये नाबाद 70 आणि स्टब्सने 32 बॉलमध्ये नाबाद 39 रनची खेळी केली. लखनऊकडून प्रिन्स यादवला 2, मोहम्मद शमीला 1 आणि मोहसिन खानला 1 विकेट मिळाली.
या सामन्यात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि लखनऊला 18.4 ओव्हरमध्ये 141 रनवर ऑलआऊट केलं. दिल्लीकडून टी नटराजन आणि लुंगी एनगिडी यांना प्रत्येकी 3-3 विकेट मिळाल्या, तर कुलदीप यादवला 2 विकेट घेण्यात यश आलं. लखनऊ सुपर जाएंट्सचा हा पहिल्या इनिंगमधला सगळ्यात कमी स्कोअर होता, याआधी 2022 साली पंजाबविरुद्ध पुण्यात झालेल्या सामन्यात त्यांना 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 153 रन करता आल्या होत्या.
advertisement

एनगिडीचा भेदक स्पेल

लुंगी एनगिडीने 3.4 ओव्हरमध्ये 27 रन देऊन 3 विकेट मिळवल्या. एनगिडीने त्याच्या या स्पेलमध्ये निकोलस पूरनला 8 रन केले, यानंतर 19व्या ओव्हरमध्ये त्याने एनरिक नॉर्किया आणि मोहसिन खान यांना लागोपाठ 2 बॉलवर आऊट केलं.

मुंबईविरुद्ध हॅट्रिकवर एनगिडी

आता दिल्ली कॅपिटल्सचा पुढचा सामना 4 एप्रिलला मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. मुंबईविरुद्ध एनगिडीने पहिल्याच बॉलला विकेट घेतली तर त्याची हॅट्रिक पूर्ण होईल. मुंबईकडून रोहित शर्मा आणि रियान रिकलटन हे दोघं ओपनिंगला बॅटिंगसाठी येतील, त्यामुळे एनगिडीची हॅट्रिक रोखण्याचं आव्हान दोघांसमोर असेल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : विजय दिल्लीचा, पण टेन्शन रोहितला... मुंबईविरुद्धच्या सामन्यात एनगिडी हॅट्रिकवर!
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement