IPL 2026 : धोनीला आता होतोय पश्चाताप... रिलीज केलं त्यानेच गेम फिरवला, दिल्लीसाठी एकटा लढला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जाएंट्सवर 6 विकेटने विजय मिळवला आहे. लखनऊने दिलेलं 142 रनचं आव्हान दिल्लीने 17.1 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं.
लखनऊ : आयपीएल 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जाएंट्सवर 6 विकेटने विजय मिळवला आहे. लखनऊने दिलेलं 142 रनचं आव्हान दिल्लीने 17.1 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीची सुरूवात अत्यंत खराब झाली. 26 रनवरच दिल्लीने त्यांच्या 4 विकेट गमावल्या होत्या, पण त्यानंतर समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी दिल्लीचा विजय निश्चित केला.
समीर रिझवीने 47 बॉलमध्ये नाबाद 70 रन केले, ज्यात 5 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर ट्रिस्टन स्टब्सने 32 बॉलमध्ये नाबाद 39 रनची खेळी करून समीर रिझवीला चांगली साथ दिली. आयपीएल 2024 मध्ये समीर रिझवी हा सीएसकेच्या टीममध्ये होता, पण आयपीएल 2025 मध्ये सीएसकेने त्याला रिलीज केलं.
सीएसकेने समीरला सोडलं
advertisement
आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सने समीर रिझवीला 8.40 कोटी रुपयांना विकत घेतलं, पण 2024 च्या मेगा ऑक्शनआधी त्यांनी समीर रिझवीला रिलीज केलं. लिलावामध्ये सीएसकेने रिझवीवर बोली तर लावली पण 95 लाख रुपयांच्या पुढे ते गेले नाहीत. अखेर दिल्ली कॅपिटल्सने समीर रिझवीला 8.40 कोटी रुपयांना विकत घेतलं. यानंतर 2024 मध्ये समीर रिझवीने स्थानिक क्रिकेटमध्ये 37 दिवसांमध्ये 3 डबल सेंच्युरी ठोकल्या होत्या.
advertisement
आता समीर रिझवीने दिल्ली कॅपिटल्सला फक्त अडचणीतूनच बाहेर काढलं नाही तर त्यांना एकहाती विजयही मिळवून दिला. चेन्नई सुपरकिंग्स आणि एमएस धोनीला आता समीर रिझवीला रिलीज केल्याचा पश्चाताप नक्कीच होत असेल.
दिल्लीचा विजय
या सामन्यात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि लखनऊला 18.4 ओव्हरमध्ये 141 रनवर ऑलआऊट केलं. दिल्लीकडून टी नटराजन आणि लुंगी एनगिडी यांना प्रत्येकी 3-3 विकेट मिळाल्या, तर कुलदीप यादवला 2 विकेट घेण्यात यश आलं. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या 4 विकेट स्वस्तात गेल्या. लखनऊकडून प्रिन्स यादवने 2 विकेट घेतल्या तर मोहसिन खान आणि मोहम्मद शमी यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
advertisement
Location :
Lucknow,Uttar Pradesh
First Published :
Apr 01, 2026 11:58 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : धोनीला आता होतोय पश्चाताप... रिलीज केलं त्यानेच गेम फिरवला, दिल्लीसाठी एकटा लढला!









